Tuesday, May 21, 2024
Homeजिल्हाMega job: भारतात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या डी फार्म मेगा जॉब फेअरला विद्यार्थ्यांचा...

Mega job: भारतात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या डी फार्म मेगा जॉब फेअरला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Mega job/ राजेंद्रकुमार शेळके : डी फार्मसी क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याना एकाच छताखाली विविध औषध निर्माण कंपन्यांना एकत्र आणून नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन पुणे यांनी प्रथमच आयोजित केलेल्या डी फार्म मेगा जॉब फेयरला संपूर्ण महाराष्ट्रातून उर्त्स्फूत प्रतिसाद लाभला. (Mega job)

पुणे शहर आणि जिल्ह्यातील एकूण ४६ पदविका औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालये आणि २५ फार्मास्युटिकल कंपन्यांनी आपला सहभाग नोंदवला. पुणे कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्स येथे हा जॉब फेअर यशस्वीरित्या पार पडला. महाराष्ट्रातून एकुण २००० विद्यार्थ्यानी या जॉबफेअर मध्ये आपली नाव नोंदणी केली होती. तसेच स्पॉट रजिस्ट्रेशन करूनही विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. औषध निर्माण क्षेत्रातील एकुण २५ कंपन्या जॉब फेअर मध्ये सहभागी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या चॉईस ची कंपनी निवडण्याकरिता संधी उपलब्ध झाली.

यावेळी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे मान्यता समिती सल्लागार डॉ.नरेंद्र गोवेकर, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास व रोजगार पुणे विभागाच्या उपयुक्त अनुपमा पवार, तंत्रशिक्षण संचलनालयाच्या पुणे विभागीय कार्यालयाचे सहाय्यक संचालक मारुती जाधव,महाराष्ट्र फार्मसी कौन्सिल चे अध्यक्ष अतुल अहिरे,उपस्थित होते. सर्वच मान्यवरांनी या प्रकारचा जॉब फेअर घेऊन डिप्लोमा फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविल्या बद्दल सर्व आयोजकांचे कौतुक आणि आभार मानले. (Mega job)

डी फॉर्म मेगा फेअर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रो.पी.ए.जाधव, डॉ.आर‌.व्ही.शेटे, डॉ. व्ही. एन जगताप, डॉ सचिन कोतवाल, प्रो. प्रविण जावळे, प्रो.प्रशांत हंबर, डॉ.प्रवीण साबळे, डॉ.बी. व्ही. मथादेवरु, डॉ. अमोल शहा, डॉ. जी.एम.स्वामी, प्रो. एन.ए. पाटील या सर्व प्राचार्यांनी खूप मेहनत घेतली. अशाप्रकारे भविष्यात सुद्धा यापेक्षा मोठ्या प्रमाणात मेगा फेअर घेऊन जास्तीत जास्त फार्मसी कंपन्यांना एकत्र आणून विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सर्व आयोजकांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिरुद्ध दडके आणि प्रा. प्रियंका बोरुडे यांनी आणि आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ.सचिन कोतवाल यांनी मानले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

धक्कादायक : प्रसिद्ध अभिनेत्रीची व्हॉट्सॲप स्टेट्स ठेवत आत्महत्या

स्वतःसाठी खोके घेऊन गप्प बसणाऱ्यांना घरी बसवा – खासदार प्रियंका चतुर्वेदी

ब्रेकिंग: अभिनेता साहिल खान पोलिसांच्या ताब्यात, वाचा काय आहे प्रकरण !

ब्रेकिंग : शरद पवारांना मोठा धक्का ; उमेदवारावरच गुन्हा दाखल, अटकेची टांगती तलवार

मोठी बातमी : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम लोकसभेच्या मैदानात, ‘या’ पक्षाकडून उमेदवारी जाहीर

मोठी बातमी : भांडूपमध्ये पैशाने भरलेली गाडी पोलिसांच्या हाती, राज्यभरात खळबळ

ब्रेकिंग : राज्यात आणखी एका बँकेला ९ कोटींचा गंडा, भाजप पदाधिकाऱ्यांना अटक

मोठी बातमी : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील अभिनेता बेपत्ता

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय