Wednesday, May 1, 2024
Homeताज्या बातम्याAmol Kolhe : शिरूर लोकसभेसाठी डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Amol Kolhe : शिरूर लोकसभेसाठी डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Amol Kolhe : शिरूर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. पुणे, मावळ व शिरूर या तीन लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीने आज पुण्यात शक्ती प्रदर्शन करत तिन्ही उमेवारांचे अर्ज दाखल केले.

शिरूर लोकसभेसाठी पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी अर्ज दाखल केला. कोल्हे यांनी आपला अर्ज शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्याकडे सुपुर्द केला.

अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आणि माझ्या आईच्या आशीर्वादाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून शिरूर लोकसभा मतदारसंघातून मी ‘तुतारी फुंकणारा माणूस’ या चिन्हावर निवडणूक लढवित आहे, असे कोल्हे म्हणाले.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मला पुन्हा लोकसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळेल हा विश्वास आहे म्हणत शेतकरी बांधवांच्या हक्कांसाठी, माता भगिनींच्या सन्मानासाठी, युवकांच्या भविष्यासाठी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मी अविरतपणे संघर्ष करत आहे. या संघर्षाला मायबाप जनतेचं पाठबळ नक्की मिळेल असा विश्वासही कोल्हे यांनी व्यक्त केला.

पुणे विधानभवन येथे निवडणूकीचा उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी खा.सुप्रिया सुळे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी राज्यमंत्री विश्वजित कदम, आ.अशोकबापु पवार, आ.सचिन अहिर, आ.संजय जगताप, आ. संग्राम थोपटे, माजी आ. महादेव बाबर, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार हे देखील उपस्थित होते.

दरम्यान, त्याच वेळी बारामती लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : डॉ. अमोल कोल्हे आईचा आशिर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार

ब्रेकिंग : भाजप खासदाराचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश

ब्रेकिंग : मुसळधार पावसाने दुबईत महापूर

बीड लोकसभा मतदारसंघासाठी उद्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ

IFSCA : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण अंतर्गत भरती

मतदारांनो ! तुम्ही सुध्दा जिंकू शकता बाईक, रेसींग सायकल आणि ॲन्ड्राईड मोबाईल

…आमच्यासाठी कचाकचा बटन दाबा; अजित पवार वादाच्या भोवऱ्यात

मोठी बातमी : सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यासाठी मोजावे लागणार पैसे

ब्रेकिंग : माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाला भीषण अपघात

मोठी बातमी : “या” दोन बँकांतून पैसे काढण्यावर निर्बंध; तुमची बँक तर नाही ना?

ब्रेकिंग : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर पोलिस आणि नक्षलवाद्यांत मोठी चकमक, २९ नक्षलवाद्यांचा खात्मा


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय