Sunday, December 8, 2024
Homeताज्या बातम्याChandwad: एसटीचा भीषण अपघात, रस्त्यावर रक्ता मांसाचा चिखल

Chandwad: एसटीचा भीषण अपघात, रस्त्यावर रक्ता मांसाचा चिखल

Chandwad: मुंबई आग्रा महामार्गावर जळगावकडून नाशिकला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 5 प्रवासी जागीच ठार झाले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघात इतका भीषण होता की, यामध्ये बसची एक बाजू पूर्ण कापली गेली. यामुळे त्या बाजूला बसलेले प्रवासी रस्त्यावर पडले. यात काहींचा जागीच मृत्यू झाला तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकला धडकल्यानंतर भीषण अपघात झाला. accident of Chandwad ST bus

याबाबत सविस्तर मिळालेली माहिती अशी की, एसटी बस जळगावकडून नाशिकला जात होती. त्यावेळी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना हा अपघात झाला अशी माहिती समोर येतेय. अपघातात एसटीची एक बाजू कापली गेलीय. घटनास्थळी रक्तामांसाचा चिखल पडला होता. अनेक प्रवासी रस्त्यावर पडले. घटनास्थळावरील दृश्ये अंगाचा थरकाप उडवणारी होते. रस्त्यावर मृतदेह पडले होते. ज्या बाजूला धडक बसली त्या बाजूचे प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत. त्यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. जखमी प्रवाशांना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहूड जवळ एसटी आणि ट्रकचा हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तर मृतदेहांची ओळख पटवण्यात येत आहे. सरकारने मृतांना दहा लाख आणि जखमींना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. 

मृतांची नावे 

1) साई संजय देवरे ( वय – 14) रा. उमराने ता.देवळा जि.नाशिक

2) बळीराम सोनू आहिरे ( वय – 64) रा.प्लॉट नंबर ७ शांतीवन,कॉलेज रोड नाशिक

3) सुरेखा सीताराम साळुंखे ( वय – 58)

4) सुरेश तुकाराम सावंत ( वय – 28) रा.मेशी डोंगरगाव ता.देवळा

एका मयताचे नाव नाही कळले

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

संपत्तीसाठी लालची मुलाने बापाला बेदम मारले, व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद

WhatsApp वर बिना इंटरनेट पाठविता येणार फाइल्स

अमित शहांचे हेलिकॉप्टर जोरदार वाऱ्यामुळे डगमगले, मोठी दुर्घटना टळली

निवडणूक प्रचारात कोल्हे आढळराव आमनेसामने !

ब्रेकिंग : अमोल कोल्हे यांची डोकेदुखी वाढली, आणखी एका उमेदवाराला तुतारी चिन्ह

ब्रेकिंग : वसंत मोरे यांना निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्ह बहाल

केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई अंतर्गत भरती; आजच करा!

NCTE : राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

संबंधित लेख

लोकप्रिय