Thursday, May 2, 2024
Homeताज्या बातम्याकाँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसच्या महासचिवाचा वंचितमध्ये प्रवेश

काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसच्या महासचिवाचा वंचितमध्ये प्रवेश

Utkarsha Rupwate : शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupwate) यांनी वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणूकीच्या काळात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा हक्काचा बालेकिल्ला मानला जायचा. काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री दादासाहेब रुपवते यांची नात आणि प्रेमानंद रुपवते यांची उत्कर्षा रुपवते मुलगी. त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्या आहेत. यांनी काँग्रेसला धक्का देत वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश केला आहे.

काँग्रेस पक्षाकडून शिर्डी लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळावी यासाठी उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupwate) या आग्रही होत्या. त्यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडे उमेदवारी आग्रह धरला होता, मात्र शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाला गेल्याने त्या नाराज झाल्या. या मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात दिली आहे.

त्यानंतर उत्कर्षा रुपवते त्यांनी अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत रात्री उशिरा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात अधिकृत प्रवेश केला. तसेच त्यांना शिर्डी लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे आणि माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि उत्कर्षा रुपवते अशी तिरंगी लढत होणार आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

Police Bharti: पोलिस भरतीसाठी “तब्बल” इतके अर्ज!

राज्यातील ५ मतदार संघात मतदान सुरू, सकाळी दोन तासात झाले ७.२८ टक्के मतदान

मोठी बातमी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ईडीची कारवाई, मालमत्ता केली जप्त

ब्रेकिंग : शिरूर लोकसभेसाठी डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ब्रेकिंग : रवींद्र धंगेकर यांच्याकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल

ब्रेकिंग : सुप्रिया सुळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ब्रेकिंग : डॉ. अमोल कोल्हे आईचा आशिर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार

ब्रेकिंग : भाजप खासदाराचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश

ब्रेकिंग : मुसळधार पावसाने दुबईत महापूर

बीड लोकसभा मतदारसंघासाठी उद्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ

IFSCA : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण अंतर्गत भरती


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय