Thursday, May 2, 2024
Homeताज्या बातम्याLok Sabha Election :राज्यातील ५ मतदार संघात मतदान सुरू, सकाळी दोन तासात...

Lok Sabha Election :राज्यातील ५ मतदार संघात मतदान सुरू, सकाळी दोन तासात झाले ७.२८ टक्के मतदान

Lok Sabha Election (दि.१९) : आज १९ एप्रिल २०२४. देशातील लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला आज सुरुवात झाली. या उत्सवासाठी सकाळपासून मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी रांगा लागल्या. देशातील १०२ जागांवर मतदान होणार आहे, यामध्ये महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात मतदान होणाक आहे. २१ राज्यांमध्ये १०२ मतदार संघात १६२५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी १८ लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पहिल्या टप्प्यातील मतदान आज दि.१९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. पहिल्या टप्प्यात आज विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदार संघात मतदान होत आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर जवान तैनात करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात पहिल्या दोन तासात म्हणजे सकाळी ७.०० ते ९.०० वाजेपर्यंत ७.२८ टक्के मतदान झाले आहे.

पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

रामटेक ५.८२ टक्के

नागपूर ७.७३ टक्के

भंडारा- गोंदिया ७.२२टक्के

गडचिरोली- चिमूर ८.४३टक्के

आणि चंद्रपूर ७.४४ टक्के आहे.

तसेच, सकाळी ७ वाजता सुरु झाले आहे तर ते संध्याकाळी ६ पर्यंत चालू असणार आहे. 

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ईडीची कारवाई, मालमत्ता केली जप्त

ब्रेकिंग : शिरूर लोकसभेसाठी डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ब्रेकिंग : डॉ. अमोल कोल्हे आईचा आशिर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार

ब्रेकिंग : भाजप खासदाराचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश

ब्रेकिंग : मुसळधार पावसाने दुबईत महापूर

बीड लोकसभा मतदारसंघासाठी उद्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ

IFSCA : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण अंतर्गत भरती


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय