Thursday, May 2, 2024
Homeताज्या बातम्याUPSC : युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी

UPSC : युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी

UPSC : नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षा २०२३ चा अंतिम निकाल जाहीर झाला. त्यात पुणे येथील सारथी संस्थेमार्फत मुलाखतीसाठी प्रायोजित ४५ विद्यार्थ्यांपैकी २० विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. ज्यामध्ये ४ विद्यार्थिनींचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातून ६, नाशिक जिल्ह्यातून ५, अहमदनगर जिल्ह्यातून २ तसेच कोल्हापूर, बुलढाणा, जळगाव, अकोला, वाशिम, हिंगोली, व सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी एक विद्यार्थी यशस्वी झाला आहे, अशी माहिती सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी दिली. UPSC Exam

सारथी संस्थेने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी ह्या लक्षित गटातील होतकरू विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परिक्षेच्या तयारीकरिता विद्यावेतन देऊन नवी दिल्ली व पुणे येथील नामांकित कोचिंग संस्थेत निःशुल्क प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली होती. युपीएससी मुलाखतीच्या तयारीकरिता ४५ विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण नियोजित करून तज्ञांमार्फत विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन देण्यात आले.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी ह्या लक्षित गटाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी काम करते. लक्षित गटातील उमेदवारांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता सारथी संस्था प्रयत्नशील आहे. सारथीमार्फत युपीएससीकरिता लाभ घेऊन यश मिळविलेल्या २० विद्यार्थ्यांची रँक क्रमांक व नावे पुढीलप्रमाणे :

१२२ विनय सुनील पाटील (नाशिक), १४७ आशिष अशोक पाटील (कोल्हापूर), २२४ ठाकरे ऋषिकेश विजय (अकोला), २५८ शामल कल्याणराव भगत (पुणे), २६७ उन्हाळे आशिष विद्याधर (बुलडाणा),२८७ निरंजन महेंद्रसिंह जाधवराव (पुणे), ३०८ घोगरे हर्षल भगवान (पुणे), ३५९ शुभम भगवान थिटे (पुणे), ३९५ अंकित केशवराव जाधव (हिंगोली), ४१४ खिलारी मंगेश पराजी (अहमदनगर), ४९६ पाटील लोकेश मनोहर (जळगाव), ५३१ मानसी नानाभाऊ साकोरे (पुणे), ६०४ आविष्कार विजय डेले (नाशिक), ६१० केतन अशोक इंगोले (वाशिम), ६२२ देशमुख राजश्री शांताराम (अहमदनगर), ७०६ निकम सुरज प्रभाकर (नाशिक), ७३२ कुणाल संजय अहिरराव (नाशिक), ७५९ गौरी शंकर देवरे (पुणे), ८३७ शुभम उत्तमराव बारकाळे(नाशिक), ९७६ श्रावण अमरसिंह देशमुख (सातारा), हे विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परिक्षेत यशस्वी झाले आहेत. UPSC

मागील तीन वर्षात सारथी संस्थेमार्फत ५८ विद्यार्थी युपीएससी परिक्षेत यशस्वी झाले होते. यावर्षी २० विद्यार्थी यशस्वी झाले असून आतापर्यंत सारथी संस्थेमार्फत एकूण ७८ विद्यार्थी युपीएससी परिक्षेत यशस्वी झाले आहेत.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांवर निवडणूक आयोगाचे बारिक लक्ष

ब्रेकिंग : काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसच्या महासचिवाचा वंचितमध्ये प्रवेश

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची सहावी उमेदवारी यादी जाहीर

Police Bharti: पोलिस भरतीसाठी “तब्बल” इतके अर्ज!

राज्यातील ५ मतदार संघात मतदान सुरू, सकाळी दोन तासात झाले ७.२८ टक्के मतदान

मोठी बातमी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ईडीची कारवाई, मालमत्ता केली जप्त

ब्रेकिंग : शिरूर लोकसभेसाठी डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ब्रेकिंग : रवींद्र धंगेकर यांच्याकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल

ब्रेकिंग : सुप्रिया सुळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ब्रेकिंग : डॉ. अमोल कोल्हे आईचा आशिर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार

ब्रेकिंग : भाजप खासदाराचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश

ब्रेकिंग : मुसळधार पावसाने दुबईत महापूर

बीड लोकसभा मतदारसंघासाठी उद्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ

IFSCA : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण अंतर्गत भरती


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय