Thursday, May 2, 2024
Homeलोकसभा २०२४Khopoli : खोपोलीत संजोग वाघेरे यांच्या प्रचारात इंडिया आघाडीचे कार्यकर्ते मैदानात

Khopoli : खोपोलीत संजोग वाघेरे यांच्या प्रचारात इंडिया आघाडीचे कार्यकर्ते मैदानात

खोपोली / क्रांतीकुमार कडुलकर : मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारासाठी खोपोलीतील इंडिया आघाडीचे (Indian National Developmental Inclusive Alliance) कार्यकर्ते आता मैदानात उतरले आहेत. “अरे कोण म्हणतंय येणार नायं, अरे आल्या शशिवाय राहणार नाय” अशा घोषणांनी खोपोलीतील परिसर दणाणून गेला होता. भर उन्हात कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. Khopoli news

खोपोलीतील भाऊ कुंभार चाळ शास्त्रीनगर येथील गणेश मंदिरातून महाविकास आघाडी, इंडिया आघाडीच्या (INDIA FRONT) कार्यकर्त्यांनी प्रचाराचा नारळ फोडून प्रचार सुरुवात केली. कॉंग्रेसचे जेष्ठ नेते उल्लासराव देशमुख, शेतकरी कामगार पक्षाचे कैलास गायकवाड, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरद पवार) गटाचे शहराध्यक्ष अतुल पाटील, महिला शहरअध्यक्षा सुवर्ण मोरे, कॉग्रेस महिला अध्यक्षा रेखाताई जाधव, तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्यासह महाविकास आघाडीतील (Mahavikas aghadi) विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रचारास मोठ्या संख्येने उपस्थित होते. शास्तीनगर, क्रांतीनगर आणि काटरंग परिसरात हजारोंच्या संखेने प्रचार रॅलीला सुरुवात झाली. Khopoli


शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे म्हणाले की, “प्रचाराचा झंझावात जोरात सुरु आहे. उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना खालापूर (khalapur) तालुक्यातून चांगल्या प्रकारे लीड देवू” असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरद पवार) गटाच्या महिला शहराध्यक्षा सुवर्णा मोरे म्हणाल्या की, “आताच्या सरकारला जनता त्रस्त झाली आहे. वाढती महागाई झालेली आहे. पेट्रोल, गॅस सिलेंडरचे दर तेराशे रुपयांवर गेला आहे. या महागाईला त्रस्त होवून महिला आता रस्त्यावर उतरलेल्या आहेत. त्यामुळे मावळ लोकसभेत (maval loksabha 2024) उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा विजय निश्चित आहे”.

शेतकरी कामगार पक्षाचे ( PWP) ज्येष्ठ नेते रवी रोकडे म्हणाले की, “भारतीय संविधान वाचवण्याचे काम इंडिया आघाडी करणार आहे. या सरकारला कंटाळून देशातील नागरिक, कार्यकर्ता आज पेटून उठला आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदार संघात बदल घडणार असून उमेदवार संजोग वाघेरे पाटील (Sanjog Waghere Patil) प्रचंड मतांनी निवडून येतील त्यासाठी आम्ही निर्धार केला आहे”.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल

निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित

अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण

कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे

युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी

दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांवर निवडणूक आयोगाचे बारिक लक्ष

ब्रेकिंग : काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसच्या महासचिवाचा वंचितमध्ये प्रवेश

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची सहावी उमेदवारी यादी जाहीर

Police Bharti: पोलिस भरतीसाठी “तब्बल” इतके अर्ज!

राज्यातील ५ मतदार संघात मतदान सुरू, सकाळी दोन तासात झाले ७.२८ टक्के मतदान

मोठी बातमी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ईडीची कारवाई, मालमत्ता केली जप्त


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय