Sunday, December 8, 2024
Homeताज्या बातम्या‘हिंदू विधि झाले नसल्यास लग्न ग्राह्य धरले जाणार नाही’ सर्वोच्च न्यायालय

‘हिंदू विधि झाले नसल्यास लग्न ग्राह्य धरले जाणार नाही’ सर्वोच्च न्यायालय

Hindu Marriage : हिंदू लग्नाबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. हिंदू विवाह हा एक संस्कार असून हा नाच-गाण्याचा, जेवणाचा किंवा दारु पिण्याचा कार्यक्रम नाही, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. तसेच सप्तपदी आणि इतर विधींशिवाय हिंदू विवाह (Hindu Marriage) मान्य नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. न्या. बीवी नागरत्न आणि न्या. ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने एका प्रकरणाची सुनावणी करताना ही टिप्पणी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने हिंदू विवाह कायद्यांतर्गत विवाह वैध ठरण्यासाठी केवळ मॅरेज सर्टिफिकेटच पुरेसे नाही, तर लग्न विधिवत होणे अत्यंत गरजेचे असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच एखाद्याच्या लग्नात हिंदू विधि झाले नसल्यास ते लग्न ग्राह्य धरले जाणार नाही, असा निर्णय देखील त्यांनी दिला आहे.

Hindu Marriage जेवणापुरता मर्यादित नाही

हिंदू लग्नाबाबत (Hindu Marriage) महत्त्वपूर्ण निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, हिंदू विवाह हा केवळ गाणे-नृत्य किंवा मद्यपान, जेवणापुरता मर्यादित नाही. जर लग्नामध्ये विधी, समारंभ (सप्तपदी) असणे आवश्यक आहे, तसे नसेल हा विवाह केवळ नोंदणीद्वारे वैध मानला जाऊ शकत नाही. हिंदू विवाहात ‘सप्तपदी’ म्हणजेच ‘अग्नीसमोर सात फेरे घेणे’ हे सर्वात महत्त्वाचे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले.

लाइव्ह लॉच्या रिपोर्टनुसार, हिंदू विवाह कायदा 1955 च्या आधारे, सर्वोच्च न्यायालयाने असा विवाह रद्द केला आहे, ज्यामध्ये विवाह प्रमाणपत्रावर पती-पत्नीची स्वाक्षरी होती, परंतु त्यांच्या विवाहाचा कोणताही विधी पार पडला नव्हता. कुटुंबीयांनी ‘काही कारणास्तव’ आधीच त्यांच्या लग्नाची नोंदणी करून घेतली होती, पण आता या जोडप्याने सर्वोच्च न्यायालयात लग्न रद्द करण्यासाठी अपील केले होते.

हिंदू विवाह हा एक संस्कार असून विवाहाला भारतीय समाजात एक महत्त्वाची संस्था म्हणून दर्जा मिळायला हवा. तसेच तरुणांनी विवाहाचा विचार करताना भारतीय समाजात विवाह संस्था ही किती पवित्र आहे, याचा विचार करायला हवा”, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

कोरोना लसीचे साईड इफेक्ट; लस प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटवला, चर्चेला उधान

‘अनुपमा’ फेम अभिनेत्री रुपाली गांगुली राजकारणात उतरली, ‘या’ पक्षात केला प्रवेश

ब्रेकिंग : मिमिक्री आर्टिस्ट श्याम रंगीला पंतप्रधान मोदींच्या विरोधात लढणार निवडणूक

निवडणूकीच्या अगोदर अरविंद केजरीवाल यांना अटक का ? सर्वोच्च न्यायालयाचे ईडीला ५ प्रश्न

काँग्रेस मुख्यालयावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचताही येईना, प्रश्न विचारताच विद्यार्थ्यांची फजिती

संबंधित लेख

लोकप्रिय