Thursday, May 2, 2024
Homeजिल्हाPune : निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित

Pune : निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित

Pune : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ केल्याप्रकरणी खडकवासला विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्त सहा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय आसवले यांनी दिली आहे. Pune

पुणे महानगरपालिकेच्या कै. ह. तू. थोरवे प्राथमिक विद्यालय शाळा क्र. १६२ बी व विद्या निकेतन १९ चंद्रभागनगर कात्रज या शाळेतील शिक्षकांना निवडणूक कामकाजाकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून आदेश बजावण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांनी वारंवार संधी देऊनही त्यांना नियुक्त केलेल्या भागाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून आपले निवडणूक कर्तव्य पार पाडण्यात अक्षम्य दुर्लक्ष, कुचराई, दिरंगाई केल्याच्या कारणास्तव त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० कलम ३२ अन्वये निलंबनाची कारवाई प्रस्तावित करावी असे निर्देश पुणे महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

यापुढेही निवडणूक कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यासह कडक कारवाई करण्यात येईल, असेही आसवले यांनी स्पष्ट केले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांवर निवडणूक आयोगाचे बारिक लक्ष

ब्रेकिंग : काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसच्या महासचिवाचा वंचितमध्ये प्रवेश

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची सहावी उमेदवारी यादी जाहीर

Police Bharti: पोलिस भरतीसाठी “तब्बल” इतके अर्ज!

राज्यातील ५ मतदार संघात मतदान सुरू, सकाळी दोन तासात झाले ७.२८ टक्के मतदान

मोठी बातमी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ईडीची कारवाई, मालमत्ता केली जप्त

ब्रेकिंग : शिरूर लोकसभेसाठी डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ब्रेकिंग : रवींद्र धंगेकर यांच्याकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल

ब्रेकिंग : सुप्रिया सुळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ब्रेकिंग : डॉ. अमोल कोल्हे आईचा आशिर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार

ब्रेकिंग : भाजप खासदाराचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय