Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : नरेंद्र मोदी यांच्या रुपाने महायुतीच्या उमेदवारांना निवडून देणार

PCMC : नरेंद्र मोदी यांच्या रुपाने महायुतीच्या उमेदवारांना निवडून देणार

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केले, तीन तलाक पद्धत बंद केली, अयोध्येत श्रीराम मंदिर उभारले. तसेच, आता समान नागरी कायदा आणणे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वातील सरकारचे प्रमुख काम आहे. सर्वांना सारखाच न्याय देण्याचे काम मोदीजींनी केले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आपल्या मताची किंमत ओळखून देशाची सूत्रे पुन्हा एकदा मोदीजींच्या हातात देण्यासाठी महायुतीचे उमेदवारांना मतदान करणार असल्याची ग्वाही पिंपरी चिंचवड शहरातील सुज्ञ नागरिक देत आहेत. pcmc news

मावळ व शिरुर, बारामती लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ भाजपाकडून प्रचाराचा धडाका सूरू आहे. शहराध्यक्ष शंकर जगताप (Shankar Jagtap) यांच्या नेतृत्वात पिंपरी, चिंचवड, भोसरी आ‍णि बारामती मतदार संघातील ताथवडे परिसरात भाजपच्या पदाधिका-यांनी नमो संवाद सभांद्वारे नागरिकांसोबत संवाद साधला जात असून, मोदीजींचा विकासाचा जाहिरनामा पोहोचविण्यात येत आहे. मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी नागरिकांनी ही निवडणुक आपल्या हाती घेतल्याचे दिसून येत आहे.

वाकड, विनोदेवस्ती, रावेतमध्ये ‘नमो संवाद सभा’

महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे (Shrirang Barane) यांच्या प्रचारार्थ रावेत येथील कॅलेस्टियल आणि सिल्व्हर ग्रेसीया या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये नमो संवाद सभा झाली. तब्बल ६० वर्षे गरीबी हटावचा केवळ नारा देत मतांसाठी गरीबांना झुलविणाऱ्या काँग्रेसने गरीबांसाठी काहीच केले नाही. मात्र मोदी सरकारने केवळ १० वर्षात २५ कोटी नागरिकांना गरीबीतून बाहरे काढले आहे. या १० वर्षांच्या काळात देशाने सर्वच क्षेत्रात चौफेर प्रगती साधली आहे.

जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था भारत बनली आहे. मोदी सरकार हे जनतेचे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण देशाच्या आणि जनतेच्या सेवेसाठी समर्पित आहे. त्यासाठी मावळ मतदारसंघात श्रीरंगआप्पा बारणे यांना मतदान करून बहुमताने विजयी करावे, असे आवाहन महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी भाजपाचे शहर सरचिटणीस नामदेव ढाके, युवासेना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विश्वजीत बारणे, भाजपाचे रावेत-काळेवाडी मंडल अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, दिपक भोंडवे, प्रदीप बारणे, शीला भोंडवे, शैला पासपुते, प्राजक्ता रुद्रावर, प्रदीप बिझगे, खंडी पवार, सचिन गावडे, निखील जाधव आदी उपस्थित होते. BJP PIMPRI CHINCHWAD

वाकड, विनोदेवस्ती येथे नमो संवाद सभा

कोरोना काळात देशात लस तयार केल्यामुळे जगातील असंख्य लोकांचे प्राण वाचले. विकासाला गती देणारा देश म्हणून भारताने आपली ओळख जगात अधोरेखित केली आहे. हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळे शक्य झाले आहे. भारताला जागतिक महासत्ता बनविण्यासाठी मतदारांनी पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान करावे, असे आवाहन वाकड, विनोदेवस्ती येथील संवाद सभेत करण्यात आले. यावेळी भाजपा महिला मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य भारतीताई विनोदे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, मंडल अध्यक्ष प्रसाद कस्पटे, माजी स्वीकृत नगरसेवक संदीप गाडे, महिला मोर्चा मंडल अध्यक्षा पियुषा पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र विनोदे, रामदास कस्पटे, तौसीफ शेख तसेच शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, पेज प्रमुख, कार्यकर्ते आणि परीसारतील नागरिक उपस्थित होते.

पिंपळेगुरव मधील अनंतनगर व गणेशनगर येथे नमो संवाद सभा…

पिंपळेगुरव मधील अनंतनगर व गणेशनगर येथे नमो संवाद सभा झाली. यावेळी नागरिकांनी आपले मते मांडली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिराची (Ram Temple) उभारणी करून रामलल्लाची प्रतिष्ठापनाही केली. त्यांनी देशातील रामभक्तांची अनेक दशकांची इच्छा पूर्ण केली. विकासाची कावडयात्रा खांद्यावर घेऊन मोदीजी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहेत. मोदी यांनी १० वर्षात देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली. पुन्हा सत्तेवर आल्यावर पाच वर्षातच अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर येणार असून, याचा फायदा दलित, आदिवासी, वंचित, उपेक्षित सर्वांना होणार आहे. म्हणूनच महायुतीचे उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन नागरिकांनी केले.

यावेळी मा.नगरसेवक श्री.शशिकांत कदम, माजी नगरसेविका उषाताई मुंढे, मा. स्वीकृत सदस्य महेश जगताप, सामाजिक कार्यकर्ते नरेश जगताप, अमर आदियाल, प्रभाग अध्यक्ष दिपक काशीद, रमेश काशीद, राहुल जवळकर, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत दुधारे, राजेश लोखंडे, सारंग लोखंडे, शंकर लोखंडे, गणेश लोखंडे, अशोक शिंदे, नवनाथ शिंदे, हनुमंत शिंदे, अनिल जाधव, संतोष मोहिते, रोहित शिंदे, प्रवीण मोहिते, श्री.भोसले, दुर्गाताई आदियाल, संगीताताई लोखंडे, गणेश तोरडमल, श्री.पानासकर, प्रशांत मोकासे आदी उपस्थित होते. pcmc news

पिंपळेगुरव मधील वैदुवस्ती, सिंहगड व पारिजात कॉलनी येथे नमो संवाद सभा…

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पिंपळेगुरव मधील वैदुवस्ती येथे नमो संवाद सभा झाली. यावेळी माजी नगरसेवक शशिकांत कदम, माजी नगरसेविका उषा मुंढे, स्वीकृत सदस्य महेश जगताप, सामाजिक कार्यकर्ते नरेश जगताप, अमर आदियाल, पल्लवी जगताप, दिपक काशीद, रमेश काशीद, राहुल जवळकर, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत दुधारे, राजेश लोखंडे, राजू लोखंडे, दशरथ लोखंडे, रामदास लोखंडे, दुर्गा लोखंडे, दुडे मामा, रामू लोखंडे, गावडे मामा, चंद्रकांत शिंदे, पंढरी लोखंडे आदी उपस्थित होते.

पिंपळेगुरवमधील सुदर्शननगर येथे नमो संवाद सभा…

पिंपळेगुरव मधील सुदर्शननगर येथे नमो संवाद सभा झाली. गरीबीची कुचेष्टा आणि गरीबांची फसवणूक करणाऱ्या काँग्रेसने जनतेच्या क्षमतेवर कधीच विश्वास ठेवला नाही. काँग्रेससोबत एकत्र आलेल्या पक्षांचा परस्परांवर विश्वास नाही. त्यामुळे जनतेनेही काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवू नये. लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील जनतेने भरभरून प्रेम दिले. त्यांच्यावर विश्वास टाकला आणि भरभरून आशिर्वादही दिले. पुढील काळात देशाचा वेगवान विकास करून त्याची परतफेड करण्याची गॅरंटी मोदीजींनी दिली आहे. ते दिलेली गॅरंटी पूर्ण करतात हे गेल्या १० वर्षात सर्व जनतेने अनुभवले आहे. आताही त्यांच्या गॅरंटीवर विश्वास ठेवून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. pcmc news

नवी सांगवीतील विनायकनगर, कवडेनगर येथे नमो संवाद सभा…

सांगवीतील विनायकनगर, कवडेनगर येथे नमो संवाद सभा मोठया उत्साहात पार पडली. काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात केलेल्या प्रत्येक जखमेवर इलाज आणि उपचार करण्याची मोदींजी गॅरंटी आहे. मोदी सरकारने गेल्या १० वर्षांत केलेली विकासकामे ही तर केवळ सुरूवात आहे. पुढच्या पाच वर्षांत देशातील विकासाची कामे अधिक गतीमान होतील. ३७० च्या जाचातून काश्मीरची मुक्तता, तिहेरी तलाक प्रथेतून मुस्लिम महिलांची मुक्तता, देशातील कोट्यवधी महिलांचे लखपती दीदीसारख्या योजनांतून सक्षमीकरण, युवकांना रोजगाराच्या संधी ही मोदी सरकारची कामगिरी आहे. म्हणूनच गेल्या १० वर्षात सुरू झालेल्या विकास यात्रेला बळ देण्यासाठी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे (Shrirang Barane) यांना विजयी करा. कारण ते निवडून आल्यानंतर मोदीना ताकद देणार असून, विकासाला बळ देतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी भाजपा (BJP) ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष राजेंद्र राजापुरे, माजी नगरसेवक अंबरनाथ कांबळे, विनोद बारणे, कोमलताई गौंडाळकर, संजय मराठे, कुलकर्णी काका, गणगे काका, विशाल खैरे, बबन देवकर, हनुमंत डोंबारे, आशिष कवडे, संभाजी भेगडे, डॉ. देविदास शेलार, अशोक कवडे, संदीप दरेकर, वेदांत बारणे, संजय मराठे, मनिष रेडेकर, उमेश झरेकर, प्रशांत कडलग, संभाजी भेगडे, दिनकर मोहिते, रवींद्र रासने, सोमनाथ कातोरे, प्रवीण जगताप, बसवराज हिरेमठ आदी उपस्थित होते.

कासारवाडीतील कुंदननगर, जय महाराष्ट चौक येथे नमो संवाद सभा…

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-रासपा-मनसे आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ कासारवाडीतील कुंदननगर येथे नमो संवाद सभा झाली. अयोध्येतील राम मंदिराचे ५०० वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले. पण दशकानुदशके राम मंदिरास विरोध करणाऱ्या काँग्रेसने त्यावरही बहिष्कार टाकला. प्रभू रामाच्या दरबाराचे निमंत्रण धुडकावणाऱ्यांना कधी माफ केले जाऊ शकत नाही. जो राम को ठुकरायेगा, उसको जनता ठुकरायेगी, असा नारा या सभेत देण्यात आला. जनतेची स्वप्ने हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. त्यांच्या जीवनाचा क्षण क्षण जनतेसाठी व देशसेवेसाठी समर्पित आहे. त्यामुळे श्रीरंग बारणे यांना मत देऊन मोदींचे हात बळकट करा, असे आवाहन भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी भाजपाचे प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, माऊली थोरात, पिंपरी विधानसभा निवडणुक प्रमुख अमित गोरखे, भाजपा महिला आघाडी शहराध्यक्षा सुजाता पालांडे, माजी स्वीकृत नगरसेवक कुणाल लांडगे, मंडल अध्यक्ष निलेश अष्टेकर, युवराज लांडे, तात्या जवळकर, देवदत्त लांडे, गणेश संभेराव, बाळासाहेब लांडे, सीमाताई बर्वे, गणेश संभेराव, नंदूआप्पा कदम, शोभाताई थोरात, कैलास कुटे, सुनील लांडगे, संतोष टोनगे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. pcmc news

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय