Thursday, May 2, 2024
Homeजिल्हाAmbedkar jayanti : धम्मज्योती बुद्धविहारात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती धुमधडाक्यात साजरी

Ambedkar jayanti : धम्मज्योती बुद्धविहारात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती धुमधडाक्यात साजरी

Ambedkar jayanti (रत्नदीप सरोदे) : विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती महोत्सवानिमित्त धम्म ज्योती बुद्ध विहार तांदूळवाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये गुरुवार दिनांक 11 एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीनिमित्त महात्मा फुले यांच्या प्रतिमांचे पूजन तसेच निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवार दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

यामध्ये जेष्ठ नागरिकांची आणि महिलांची संख्या लक्षणीय होती. सांधेदुखी, बीपी, शुगर, मोफत नेत्र तपासणी अशा विविध आरोग्य तपासण्या यावेळी करण्यात आल्या. त्याच दिवशी सायं 6 वाजता भव्य अशा रांगोळी स्पर्धा धम्मज्योती बुद्ध विहार येथील स्टेजवर काढण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये मुलींनी अत्यंत सुबक, सुंदर रंगसंगती असणाऱ्या रांगोळ्या काढून डॉ बाबासाहेबांना अभिवादन केले.


यानंतर शनिवार दिनांक 13 एप्रिल रोजी सायंकाळी 8 वाजता वक्तृत्व स्पर्धा भव्य अशा संगीत खुर्च्या आणि डान्स स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. बाबासाहेबांच्या गाण्यांवर प्रबुद्ध नगर मधील शाळकरी मुले मुली थीरकल्या. रात्री घड्याळाच्या 12 च्या ठोक्याला 133 तोफांची सलामी देऊन उपस्थित जनसमुदायाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. Ambedkar jayanti

त्यानंतर 14 एप्रिल रोजी सकाळी धम्मज्योती बुद्ध विहारांमध्ये सामुदायिक त्रिसरण, पंचशील घेण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. सर्व युवकांनी उत्स्फूर्त सहभाग दाखवत, टू व्हीलर रॅली धम्मज्योती बुद्धविहार ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा बारामती येथे शिस्तीचे प्रदर्शन करत रॅली यशस्वी रित्या पार पाडली. रॅलीच्या सुरुवातीला कल्याणी नगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन कमिटीच्या वतीने करण्यात आले. त्यानंतर बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.

सायं ठीक 7 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची भव्य शोभायात्रा आणि मिरवणूक ही धम्म ज्योती बुद्ध विहार तांदूळवाडी येथून संपूर्ण गावाला प्रदक्षिणा मारून संपन्न झाली. यामध्ये महिलांनी ,पुरुषांनी, युवकांनी आपल्या विराट शक्तीचे प्रदर्शन केले. दोन दोनच्या रांगेमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने कोणताही अनुचित प्रकार न घडू देता शांततेत ही शोभायात्रा यशस्वी केली. सरोदे डेकोरेशन यांनी लाईट्स आणि मंडपाद्वारे विहाराच्या परिसराला शोभा आणली. डीजे आर पी सिरीज यांच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्यांवर ठेका धरत सामुदायिक नृत्य विहाराच्या परिसरात सादर झाले. यावेळी ऋषिकेश भोसले यांनी प्रथमच कॅमेरा आणि व्हिडिओ ड्रोनचा वापर करत कार्यक्रमाची शोभा वाढवली.

यानंतर सोमवार दिनांक 15 एप्रिल रोजी मास्टर गरुडा मुळीक प्रस्तुत कहर ऑर्केस्ट्राचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी दिनांक 11 ते दिनांक 13 या कालावधीत घेतलेल्या सांस्कृतिक स्पर्धांच्या बक्षिस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये सहभागी असलेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. आयु मंगेश दादा सरोदे (SRPF) यांच्या वाढदिवसानिमित्त पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मोफत इंग्रजी शिका हे पुस्तके वाटण्यात आली.

स्पर्धेमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा निकाल पुढीलप्रमाणे :

चित्रकला स्पर्धा
प्रथम क्रमांक हर्षदा रवींद्र सरोदे,
द्वितीय क्रमांक वैष्णवी दर्शन सरोदे,
तृतीय क्रमांक रिद्देश विशाल सरोदे

वक्तृत्व स्पर्धा

प्रथम क्रमांक राधा नितीन गाडे
द्वितीय क्रमांक अस्मिता प्रभाकर काकडे
तृतीय क्रमांक प्रणिता संतोष सरोदे

निबंध स्पर्धा

प्रथम क्रमांक अभय संजय शिंदे
द्वितीय क्रमांक राधा नितीन गाडे
तृतीय क्रमांक समृद्धी एकनाथ सरोदे


संगीत खुर्ची

प्रथम क्रमांक श्रेया शरद सरोदे,
द्वितीय क्रमांक महेश अशोक काळे
तृतीय क्रमांक यश युवराज कांबळे

रांगोळी स्पर्धा

प्रथम क्रमांक दीक्षा संतोष बाविस्कर
द्वितीय क्रमांक रेश्मा सुमित गायकवाड
तृतीय क्रमांक राजनंदिनी माणिक वाघमारे

डान्स स्पर्धा

प्रथम क्रमांक आर्या अविनाश कांबळे
द्वितीय क्रमांक माही सागर जगताप
तृतीय क्रमांक प्रिया गायकवाड ग्रुप


या सर्व विजेत्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी तर्फे ट्रॉफी देण्यात आली. या कमिटीमध्ये प्रामुख्याने अध्यक्ष भीमराव सरोदे ,उपाध्यक्ष रत्नदीप सरोदे, सचिव ॲड योगेश सरोदे ,खजिनदार विजय कांबळे, सहसचिव करण पानसरे, कार्याध्यक्ष देविदास सरोदे, सहकार्याध्यक्ष ऋषिकेश सरोदे ,सहखजिनदार ऋषिकेश भोसले यांचा समावेश होता. समाजातील प्रत्येक भीमसैनिकांनी हा जयंती कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले.Ambedkar jayanti

विशेष सूचना :

धम्मज्योती बुद्धविहार परिसरातील महिलांसाठी खास “होम मिनिस्टर” या कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दिनांक 22 एप्रिल रोजी सायंकाळी 5 : 30 वाजता करण्यात आले आहे. चांडाळ चौकडी फेम रामभाऊ जगताप यांचा हा कार्यक्रम असून यामध्ये महिलांना भरभरून बक्षिसे असणार आहेत, शिवाय प्रत्येक सहभागी घेणाऱ्या महिलेस हमखास बक्षीस असणार आहे. या बक्षीसांमध्ये प्रामुख्याने,

प्रथम बक्षीस पैठणी व कुलर
द्वितीय बक्षीस पैठणी व गॅस शेगडी
तृतीय बक्षीस पैठणी व टेबल फॅन
चतुर्थ बक्षीस पैठणी व कुकर
पाचवे बक्षीस पैठणी व डिनर सेट
सहावे बक्षीस पैठणीवर ज्यूस ग्लास सेट
सातवे बक्षीस पैठणी व इस्त्री


शिवाय इतर बक्षिसे म्हणून सोन्याची नथ, चांदीचे नाणे आणि लकी ड्रॉ मधील विजेत्यांसाठी दहा पैठण्या बक्षीस म्हणून मिळणार आहेत.

तरी प्रबुद्धनगर तांदुळवाडी येथील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने या पैठणीच्या खेळात सहभागी व्हायचे आहे. असे आवाहन भीमजयंती उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील बातम्यांवर निवडणूक आयोगाचे बारिक लक्ष

ब्रेकिंग : काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसच्या महासचिवाचा वंचितमध्ये प्रवेश

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभा उमेदवारांची सहावी उमेदवारी यादी जाहीर

Police Bharti: पोलिस भरतीसाठी “तब्बल” इतके अर्ज!

राज्यातील ५ मतदार संघात मतदान सुरू, सकाळी दोन तासात झाले ७.२८ टक्के मतदान

मोठी बातमी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ईडीची कारवाई, मालमत्ता केली जप्त

ब्रेकिंग : शिरूर लोकसभेसाठी डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ब्रेकिंग : रवींद्र धंगेकर यांच्याकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल

ब्रेकिंग : सुप्रिया सुळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ब्रेकिंग : डॉ. अमोल कोल्हे आईचा आशिर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार

ब्रेकिंग : भाजप खासदाराचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय