Wednesday, May 22, 2024
Homeजिल्हाKolhapur: महिलेची पर्स चोरणारा २४ तासात गजाआड; पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

Kolhapur: महिलेची पर्स चोरणारा २४ तासात गजाआड; पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

Kolhapur/ यश रुकडीकर : दि.२९ रोजी मध्यवर्ती बस स्थानक येथे चोरीची घटना घडली होती याबद्दल शाहूपुरी पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांनी तत्परतेने तपास करत २४ तासाच्या आत या चोरीचा छडा लावला व आरोपीला अटक केली.

दि.२९ रोजी कोल्हापूर (Kolhapur) मध्यवर्ती बस स्थानक येथील दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास पुणे प्लॅटफॉर्मवर बसलेल्या एका महिलेची पर्स अज्ञाताने हातोहात लंपास केली होती. या बद्दल त्या महिलेने शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

या चोरीचा तपास पोलीस करत असताना सदर चोरीचा माल विक्री करण्यासाठी हा चोर सासणे ग्राउंड याठिकाणी येणार असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली. सासणे ग्राउंड परिसरात सापळा लावला असता एक इसम संशयित रित्या वावरताना पोलिसांना दिसला. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे चोरीला गेलेल्या सोन्याचे दागिने, दोन मोबाईल व पर्स असा मुद्देमाल सापडला. त्याच्याकडे याबद्दल चौकशी केल्यावर त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच त्याने सदर गोष्टी मध्यवर्ती बस स्थानक परिसरातून चोरी केल्याचे सांगितले.

सदर आरोपीचे सोमनाथ अशोक आंब्रे, रा. पांगरे,ता. सिन्नर, जि. नाशिक असे आहे. त्याच्याकडून ७९ हजार १०० रूपये किमतीचा मुद्देमाल तसेच ७ हजार रुपये किमतीचा एक विवो मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

सदर कारवाई सहा.फौजदार संदीप जाधव, पोलीस अंमलदार धर्मेंद्र बगाडे, मिलिंद बांगर, शुभम संपकाळ, लखन पाटील, बाबासाहेब ढाकणे, विकास चौगुले, महेश पाटील, संदीप बेंद्रे यांनी केली.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

संपत्तीसाठी लालची मुलाने बापाला बेदम मारले, व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद

WhatsApp वर बिना इंटरनेट पाठविता येणार फाइल्स

अमित शहांचे हेलिकॉप्टर जोरदार वाऱ्यामुळे डगमगले, मोठी दुर्घटना टळली

निवडणूक प्रचारात कोल्हे आढळराव आमनेसामने !

ब्रेकिंग : अमोल कोल्हे यांची डोकेदुखी वाढली, आणखी एका उमेदवाराला तुतारी चिन्ह

ब्रेकिंग : वसंत मोरे यांना निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्ह बहाल

केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई अंतर्गत भरती; आजच करा!

NCTE : राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय