Saturday, May 18, 2024
Homeजिल्हाPune : लोकसभा निवडणूक मतदानादिवशीचे आठवडे बाजार बंद

Pune : लोकसभा निवडणूक मतदानादिवशीचे आठवडे बाजार बंद

Pune, दि. ४: जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांतता, निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी येत्या ७ मे रोजी बारामती व १३ मे रोजी पुणे, मावळ व शिरुर लोकसभा मतदार संघात मतदानाच्या दिवशी भरणारे सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आदेश जारी केले आहेत. (Pune)

मुंबई मार्केट अॅण्ड फेअर अॅक्ट १८६२ चे कलम ५ अन्वये हे आदेश जारी करण्यात आले असून त्यानुसार बारामती लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या मुळशी तालुक्यातील पौड, बावधव खुर्द, पुरंदर तालुक्यातील वाल्हा, दौंड तालुक्यातील केडगांव, मलठण, रावणगाव व बोरीपार्धी, बारामती तालुक्यातील पणदरे, मुर्टी, करंजेपुल, निरावागज, उंडवडी सुपे व सोनगाव, इंदापूर तालुक्यातील लाकडी, कळस, काटी, टणू, निरवांगी व खोरोची व भोर तालुक्यातील भोर या ठिकाणचे आठवडे बाजार ७ मे रोजी बंद राहतील.

मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या मावळ तालुक्यातील टाकवे बु., शिरूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत जुन्नर तालुक्यातील बेल्हे, आंबेगाव तालुक्यातील धामणी, लाखणगाव, नागापूर, महाळुंगे पडवळ व तिरपाड, खेड तालुक्यातील कुरकुंडी, शिरूर तालुक्यातील केंदूर, तळेगांव ढमढरे, वडगांव रासाई व संविदणे या ठिकाणचे आठवडे बाजार १३ मे रोजी बंद राहतील.

या आदेशाचे कोणत्याही व्यक्तीने उल्लंघन केल्यास मुंबई मार्केट अॅण्ड फेअर अॅक्ट १८६२ मधील तरतुदीनुसार दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : रोहित वेमुला दलित नसल्याचा पोलिसांचा दावा, सर्व आरोपींना क्लीन चिट

ब्रेकिंग : दलित चळवळीतील अग्रणी नेते गंगाधर गाडे यांचे निधन

धक्कादायक : जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना जिवंत जाळल्याची घटना

ब्रेकिंग : उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दणका; 6 कंपन्यांना नोटिस

मोठी बातमी : शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

मोठी बातमी : 66 प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसचा भीषण अपघात

लोकप्रतिनिधीच्या वेशातील व्यापारी, डॉ. अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांवर निशाणा

मोठी बातमी : आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील वाहनाचा अपघात, चौघांचा मृत्यू

मोठी बातमी : ठाकरे गटाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला, 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय