Saturday, May 18, 2024
Homeताज्या बातम्याPoonch Terrorist: भारतीय वायुसेनेच्या वाहनांवर दहशतवादी हल्ला

Poonch Terrorist: भारतीय वायुसेनेच्या वाहनांवर दहशतवादी हल्ला

Poonch Terrorist : जम्मुमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. जम्मुतील पुंछमध्ये जवानांच्या गाडीवर दहशतवादी हल्ला झाल्याचे वृत्त समोर येत आहे. या हल्ल्यात काही भारतीय वायुसेनेचे जवान जखमी झाल्याची माहिती आहे. (Poonch Terrorist)

जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात शनिवारी दहशतवाद्यांनी भारतीय वायुसेनेच्या वाहनांवर गोळीबार केल्याची घटना घडली. या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान जखमी झाले. यातील 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सुरनकोट भागातील सनई टॉपकडे वाहने जात असताना सायंकाळी हा हल्ला झाला. आतापर्यंत कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. घटनेची माहिती मिळताच लष्कर आणि पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले. परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे. हल्ल्यानंतर राष्ट्रीय रायफल्सच्या एका तुकडीने परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

पूंछमधील शशिधर भागात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या दोन वाहनांवर जोरदार गोळीबार केला. ज्या वाहनांवर हल्ला झाला, त्यांना शाहसीतारजवळील सामान्य परिसरात हवाई तळाच्या आत सुरक्षित ठेवण्यात आले आहे. 

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : रोहित वेमुला दलित नसल्याचा पोलिसांचा दावा, सर्व आरोपींना क्लीन चिट

ब्रेकिंग : दलित चळवळीतील अग्रणी नेते गंगाधर गाडे यांचे निधन

धक्कादायक : जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना जिवंत जाळल्याची घटना

ब्रेकिंग : उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दणका; 6 कंपन्यांना नोटिस

मोठी बातमी : शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

मोठी बातमी : 66 प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसचा भीषण अपघात

लोकप्रतिनिधीच्या वेशातील व्यापारी, डॉ. अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांवर निशाणा

मोठी बातमी : आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील वाहनाचा अपघात, चौघांचा मृत्यू

मोठी बातमी : ठाकरे गटाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला, 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय