Saturday, May 4, 2024
Homeग्रामीणKhel paithanicha : तांदुळवाडीत जमला महिलांचा मेळ, रामभाऊंच्या उपस्थितीत रंगला पैठणीचा खेळ

Khel paithanicha : तांदुळवाडीत जमला महिलांचा मेळ, रामभाऊंच्या उपस्थितीत रंगला पैठणीचा खेळ

वृक्षारोपणाचा संदेश देत , रामभाऊच्या साथीने होम मिनिस्टर पैठणीचा खेळ संपन्न

तांदुळवाडी (वार्ताहर /रत्नदीप सरोदे ):
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती महोत्सवानिमित्त सिने अभिनेते व चांडाळ चौकडी फेम कलाकार रामभाऊ जगताप यांचा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम धम्म ज्योती बुद्ध विहार तांदुळवाडी येथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये पंचक्रोशीतील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रबुद्ध नगर परिसरातील महिलांनी विविध खेळ खेळत पैठणी जिंकण्याचा आनंद घेतला.Khel paithanicha



सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सिने अभिनेते रामभाऊ जगताप यांचा सत्कार आणि स्वागत मानाची ट्रॉफी देऊन करण्यात आले त्यानंतर मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी महिलांचा सहभाग लक्षणीय होता. धम्म ज्योती बुद्ध विहार तर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यातील हा शेवटचा कार्यक्रम खास महिलांसाठी आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महिलांना भरघोस बक्षीस देण्यात आली.Khel paithanicha


विधवांचा केला सन्मान
महाराष्ट्राला सुधारणावादी महामानवांची परंपरा लाभली आहे त्यापैकीच सावित्रीबाई फुले माता रमाई यांनी स्त्रियांसाठी आपल्या आयुष्य वेचले. विधवा स्त्रीचा प्रवास अत्यंत खडतर असतो. त्यांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळावे सन्मानाची वागणूक मिळावी याकरता विशेष खेळ घेण्यात आला. चंदूकाका सराफ अँड सन्स यांच्या वतीने सोन्याची नथ ठुशी आणि मानाची पैठणी देऊन विधवा माता-भगिनींचा सन्मान करण्यात आला.


विजेत्यांचा जल्लोष
या स्पर्धेमध्ये बजाज कुलर व पैठणी हे प्रथम पारितोषिक चैत्राली सागर मोरे यांनी पटकावले. हे पारितोषिक ॲड.योगेश सरोदे व काजल योगेश सरोदे यांच्या वतीने प्रदान करण्यात आले. द्वितीय पारितोषिक मिक्सर व पैठणी हे प्रज्ञा सागर जगताप यांनी पटकावले. हे पारितोषिक विजय कांबळे एलआयसी प्रतिनिधी व त्यांच्या आई मनीषा शिवाजी कांबळे यांच्या तर्फे देण्यात आले. तृतीय पारितोषिक टेबल फॅन व पैठणी हे करण पानसरे व त्यांच्या आई जयश्री विश्वास पानसरे यांच्यातर्फे सोनाली अविनाश कांबळे यांना देण्यात आले. चतुर्थ पारितोषिक प्रेशर कुकर व पैठणी हे भीमराव सरोदे व त्यांच्या पत्नी आरती भीमराव सरोदे यांच्या वतीने रेश्मा रवींद्र जाधव यांना देण्यात आले. Khel paithanicha

भव्य डिनर सेट आणि पैठणी हे पाचव्या क्रमांकाचे बक्षीस रत्नदीप सरोदे व त्यांच्या आई कल्पना गुरुदेव सरोदे यांच्या वतीने मीनाक्षी शरद सरोदे यांना देण्यात आले. सहावे बक्षीस ज्यूस ग्लास सेट आणि पैठणी हे सरोदे डेकोरेशनचे ऋषिकेश सरोदे व त्यांच्या आई सुरेखा बाळू सरोदे यांच्या हस्ते हिना लियाकत मंसूरी यांना प्रदान करण्यात आले. सातवे बक्षीस इस्त्री व पैठणी हे मयूर सरोदे व त्यांच्या आई गीता गोरख सरोदे यांच्या हस्ते तृप्ती सुरत सावंत यांना प्रदान करण्यात आले.


12 मतीच्या लकी ड्रॉ मधून 12 पैठण्या

स्पर्धेमधील सर्व सहभागी महिलांसाठी एक लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता. यामध्ये समाजातील दानशूर व्यक्तींनी या कार्यक्रमासाठी पैठणीचे आयोजन केले होते. त्यापैकी भारत सरोदे ,ज्योती सरोदे, सिद्धार्थ सरोदे, एकनाथ सरोदे, सागर जगताप, सुरज सरोदे, महावीर जगताप, आकाश सरोदे, तेजस सरोदे, दर्शन सरोदे, बाळासाहेब जगताप यांनी पैठण्या देऊन लकी ड्रॉ मधील विजेत्यांचा गौरव केला.


वृक्ष वाटपाचे नियोजन
उन्हाळ्यामध्ये शितल छाया मिळण्यासाठी सहभागी सर्व महिलांना प्रत्येकी दोन झाडांचे वाटप करण्यात आले. यामध्ये जांभूळ, आवळा ,आंबा ,चिकू ,पेरू अशा झाडांचा समावेश होता. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे अशी महाराष्ट्राची संस्कृती असल्याने तसेच वृक्षांचे महत्त्व मानवी जीवनामध्ये काय आहे हे पटवून देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी वन विभाग बारामती , वन विभाग पाटस यांचे विशेष सहकार्य लाभले.


अनोखी मानवंदना
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती महोत्सवानिमित्त धम्म ज्योती बुद्ध विहार व एस ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने 133 वृक्षांचे लागवड जतन व संवर्धन करण्यात येणार आहे. याकरता वनविभाग बारामती येथील अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले. संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा बसत असताना पाणीटंचाई ही गंभीर समस्या येत्या काळामध्ये निर्माण होणार आहे. वन्यजीव आणि जनावरांसाठी मुक्त पाणपोई येत्या काळामध्ये तयार करण्यात येईल जेणेकरून वन्यजीवांना हक्काचे पिण्याचे पाण्याचे ठिकाण मिळणार आहे. याकरता ऍड योगेश सरोदे आणि टीम विशेष प्रयत्नशील आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय, वाचा काय आहे कारण !

मोठी बातमी : MDH आणि Everest च्या काही मसाल्यांवर बंदी

खासदार श्रीरंग बारणे यांचा अर्ज दाखल

राज्यातील 11 मतदारसंघात २५८ उमेदवार रिंगणात

ब्रेकिंग : मतदान यादीत नाव नोंदविण्याची आज शेवटची तारिख, असा करा अर्ज !

७५ टक्क्‍यापेक्षा जास्‍त मतदान टक्केवारी साध्‍य करणाऱ्या केंद्राचा होणार सन्‍मान

प्रकाश आंबेडकरांचा खळबळजणक दावा, दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे…

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय