Saturday, May 4, 2024
Homeजिल्हानंदूरबार कुपोषण मुक्त करणार, प्रत्येक गावात सरकारी दवाखाना सुरू करणार - सुशिलकुमार...

नंदूरबार कुपोषण मुक्त करणार, प्रत्येक गावात सरकारी दवाखाना सुरू करणार – सुशिलकुमार पावरा

Sushilkumar Pavara: महाराष्ट्र राज्यात कुपोषित बालकांची संख्या २८ हजार आहे. त्यापैकी २३ हजार कुपोषित बालके एकट्या नंदूरबार जिल्ह्यात आहेत. नंदूरबार जिल्ह्यात कुपोषण व बालमृत्यूची संख्या गंभीर आहे. त्यामुळे निवडून आल्यावर आम्ही कुपोषणावर प्रामुख्याने काम करणार असल्याचे बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा अपक्ष उमेदवार सुशिलकुमार पावरा (Sushilkumar Pavara) यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत बालमृत्यू रोखणे व कुपोषण निर्मूलन या नावाखाली सरकार कोटी रूपये खर्च करते, परंतु अद्यापही बालमृत्यू व कुपोषण रोखू शकले नाही. कारण ठोस अंमलबजावणी होताना दिसत नाही. आदिवासी भागात आरोग्य सुविधांकडे सरकारचे व आरोग्य विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. नंदूरबार जिल्हा, तालुका व केंद्रातील रूग्णालयात आरोग्य सुविधांचा अभाव आहे, रिक्त पदे भरली जात नाहीत. आरोग्य केंद्र हे दुर्गम भागातील खेडेगावातून दूर अंतरावर आहेत.

नंदुरबारच्या आदिवासी भागात रस्ते नाहीत, वाहतूकीची सोय नाही, रूग्णवाहिकेची सोय नाही. त्यामुळे नंदूरबार लोकसभा क्षेत्रात दरदिवशी बालके व गर्भवती मातांचा मृत्यू होत आहे. म्हणून प्रत्येक गावात सरकारी रूग्णालय होणे आवश्यक आहे. रूग्णालयातील रिक्त पदे त्वरित भरणे आवश्यक आहेत. या भागात आरोग्य यंत्रणा पूर्णपणे बिघडलेली आहे. म्हणून नंदूरबार लोकसभा क्षेत्र कुपोषण मुक्त करणे, आरोग्य साधनसुविधा वाढवणे व प्रत्येक गावात सरकारी दवाखाना सुरू करणे हे आमचे प्राथमिक ध्येय असेल. अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

व्हिडिओ : भाषण सुरू असतानाच नितीन गडकरींना भोवळ

ब्रेकिंग : चीनमध्ये भीषण महापूर, 100,000 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी

नाशिक येथे पदवीधर व डिप्लोमा उत्तीर्णांसाठी अप्रेंटिस ची मोठी संधी

ब्रेकिंग : APMC शौचालय घोटाळा प्रकरणी संजय पानसरेंना अटक, सात कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

सोन्याच्या दर मोठी घसरण; जाणून घ्या नवीन दर

मनोज जरांगे पाटलांवरील चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात

ब्रेकिंग : सभेच्या मैदानासाठी बच्चू कडूंचा राडा, पोलिसांनीच भाजपचे गमचे…

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय