Sunday, December 8, 2024
Homeताज्या बातम्यारिझर्व्ह बँकेचे पुन्हा एका बॅंकेवर निर्बंध; तुमची तर बँक नाही ना?

रिझर्व्ह बँकेचे पुन्हा एका बॅंकेवर निर्बंध; तुमची तर बँक नाही ना?

Kotak Mahindra Bank RBI : खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्र बँकेवर रिझर्व्ह बँकेने मोठी कारवाई केली आहे. ग्राहकांच्या डेटा सुरक्षेची काळजी आणि माहिती तंत्रज्ञानाच्या अपुऱ्या सुविधांचा फटका कोटक महिंद्रा बँकेला बसला. रिझर्व्ह बँकेने बुधवारी महिंद्र बँकेवर निर्बंध लादले. बँकेला ऑनलाईन आणि मोबाइल बँकिंग माध्यमातून नवीन ग्राहक नोंदवण्यावर तसेच नव्याने क्रेडिट कार्ड वितरीत करण्यावर निर्बंध घातले आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) कोटक महिंद्रा बँकेला (Kotak Mahindra Bank) ऑनलाइन किंवा मोबाइल बँकिंग ॲप्सद्वारे नवीन ग्राहक जोडण्यापासून बंदी घातली आहे. बँकेतील अनेक त्रुटींबद्दल आरबीआयने चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे बँकेला नवीन क्रेडिट कार्डाचे वितरण देखील करता येणार नाही. मात्र, बँक तिच्या विद्यमान क्रेडिट कार्ड ग्राहकांसह इतर सर्व प्रकारच्या ग्राहकांना सेवा प्रदान करणे सुरू ठेवू शकणार आहे. केंद्रीय बँकेने बँकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम 35A अंतर्गत कोटक महिंद्रा बँकेवर ही कारवाई केली आहे.

ग्राहकांच्या डेटा सुरक्षिततेवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. आयटी इन्व्हेंटरी व्यवस्थापन, पॅच आणि बदल व्यवस्थापन, ग्राहकांची माहिती अदान-प्रदान व्यवस्थापन, व्हेंडर रिस्क मॅनेजमेंट, डेटा सिक्युरिटी आणि डेटा लीक होणे थांबविण्याचे व्यवस्थापन आणि तर अनेक तंत्रज्ञानामध्ये गंभीर त्रुटी आढळल्याचे केंद्रीय बँकेने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, कोटक महिंद्रा बँकेला ऑनलाईन नवीन ग्राहक तसेच मोबाईल बँकिंगद्वारे कोणतेही नवीन ग्राहक जोडणी आणि नवीन क्रेडिट कार्ड वाटप यावर निर्बंध आले आहेत. पण बँकेचे इतर दैनंदिन व्यवहार आणि प्रक्रिया सुरळीत असतील, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

बँकेच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) प्रणालीच्या २०२२ आणि २०२३ या वर्षातील परीक्षणात आढळून आलेल्या त्रुटी आणि उणिवांमुळे आणि त्यांचे वेळेवर निराकरण करण्यात बँक अपयशी ठरल्याने ही कारवाई केल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

या अगोदर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) मुंबईस्थित सर्वोदय सहकारी बँकेवर अनेक निर्बंध लादले आहेत. तसेच उल्हासनगर येथील कोणार्क अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर अनेक निर्बंध लादले आहेत. यामुळे या सहकारी बँकेला आता नव्याने कर्ज देता येणार नाही. हे निर्बंध २३ एप्रिलपासून लागू झाले आहेत.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

व्हिडिओ : भाषण सुरू असतानाच नितीन गडकरींना भोवळ

ब्रेकिंग : चीनमध्ये भीषण महापूर, 100,000 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी

नाशिक येथे पदवीधर व डिप्लोमा उत्तीर्णांसाठी अप्रेंटिस ची मोठी संधी

ब्रेकिंग : APMC शौचालय घोटाळा प्रकरणी संजय पानसरेंना अटक, सात कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

सोन्याच्या दर मोठी घसरण; जाणून घ्या नवीन दर

मनोज जरांगे पाटलांवरील चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात

ब्रेकिंग : सभेच्या मैदानासाठी बच्चू कडूंचा राडा, पोलिसांनीच भाजपचे गमचे…

संबंधित लेख

लोकप्रिय