Saturday, May 4, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : 'प्रेरणा' उत्सवात एस. बी. पाटीलच्या कस्तुरी पाटील ची निवड

PCMC : ‘प्रेरणा’ उत्सवात एस. बी. पाटीलच्या कस्तुरी पाटील ची निवड

वडनेर गुजरात येथे होणार नेतृत्व स्पर्धेत सहभागी

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर
: सीबीएसईच्या वतीने प्रेरणा उत्सव नेतृत्व विशेषता स्पर्धा जवाहर नवोदय विद्यालय शिरूर येथे नुकतीच घेण्यात आली.

या स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) एस. बी. पाटील विद्यालयातील विद्यार्थीनी कस्तुरी किरण पाटील हिची निवड झाली असून पुढील राष्ट्रीय स्पर्धा वडनेर, गुजरात येथे २७ एप्रिल ते चार मे या कालावधीत होणार आहे. pcmc

प्रेरणा उत्सव – नेतृत्व विशेष स्पर्धा तीन स्तरांमध्ये घेण्यात आली. यामध्ये पुण्यातील प्रत्येक शाळेतून इयत्ता नववी ते बारावी पर्यंत दोन विद्यार्थी निवडले गेले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालय, शिरूर, पुणे येथे निबंध, कविता, चित्राद्वारे कलागुणांचे सादरीकरण केले. ‘माझ्या दृष्टीपथातील भविष्यातील भारत’ या विषयावर कस्तुरी पाटील ने चित्र काढले. दुसऱ्या स्तरात ‘विकासित भारत’ तीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. तिसऱ्या स्तरावर विद्यार्थ्यांना आवडते विषय कोणते आणि का, शाळेत जायला आवडते का आदी प्रश्नांना विद्यार्थ्यांनी समर्पक उत्तरे दिली.

एस. बी. पाटील विद्यालयात अभ्यासाबरोबरच इतर विषयांवर मार्गदर्शन केले जाते. यामध्ये रोबोटिक्स, संगीत, विविध मैदानी खेळ, चित्रकला , नृत्य, संगणकशास्त्र आदींवर भर दिला जातो. विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी होता येते.

पुणे जिल्ह्यायातील ३० विद्यार्थ्यां मधून दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. शिक्षिका स्वलेहा मुजावर, क्रांती कुलकर्णी, प्राचार्या डॉ.बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा यांचे मार्गदर्शन कस्तुरीला लाभले. pcmc

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी कस्तुरीचे कौतुक करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय