Sunday, May 5, 2024
Homeताज्या बातम्याJayant Patil: व्यापारी प्रवृत्तीचा माणूस जेव्हा देशाचा प्रमुख होतो, तेव्हा लोकांना फसवण्याचे...

Jayant Patil: व्यापारी प्रवृत्तीचा माणूस जेव्हा देशाचा प्रमुख होतो, तेव्हा लोकांना फसवण्याचे उद्योग सुरु होतात – जयंत पाटील

Jayant Patil: व्यापारी प्रवृत्तीचा माणूस जेव्हा देशाचा प्रमुख होतो, तेव्हा लोकांना फसवण्याचे उद्योग सुरु होतात, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात ते बोलत होते. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ भोसरी विधानसभेतील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. अमोल कोल्हे, सचिन अहिर, धनंजय आल्हाट, सुलभा उबाळे, कैलास कदम, तुषार कामठे, मानव कांबळे आदी उपस्थित होते.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, देशावर 210 लाख कोटीचे कर्ज आहे. देशातील श्रीमंत कंपन्यांना सवलती देऊन बँकांना तोट्यात आणण्याचे काम सरकारनं केलं आहे. भारतीय जनतेची लूट करण्याची पूर्ण मुभा आहे. जीएसटीचा विषय एवढा गहन केलाय की, चपलेपासून डोक्याच्या केसांपर्यत सगळ्या गोष्टींवर जीएसटी आहे. देशातल्या जनतेकडून पैसे लुटण्याचे काम देशातल सरकार करत आहे, हे जनतेला सांगा, अस आवाहन ही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

लोकसभेच्या निवडणूका ह्या जनतेने हातात घेतलेल्या आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या दोन मराठी माणसांनी स्थापन केलेले पक्ष फोडण्याचे पाप हे भाजपने केलं. हे मराठी माणसाला आवडलेलं नाही. म्हणून महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला भाजपचा पराभव करायचा आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे भाजपच्या वळचणीला असलेल्या एका पक्षात जाऊन निवडणूक लढवत आहेत. म्हणून त्यांचाही पराभव करायचा आहे.,असेही जयंत पाटील म्हणाले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा कोणकोणत्या केल्या घोषणा !

देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहे तरी कोण ?, वाचा सविस्तर !

भुजबळांनी नकार दिल्याने, आढळराव पाटलांना उमेदवारी डॉ.अमोल कोल्हेंच्या विधानाने खळबळ

धक्कादायक : बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास

रिझर्व्ह बँकेचे पुन्हा एका बॅंकेवर निर्बंध; तुमची तर बँक नाही ना?

व्हिडिओ : भाषण सुरू असतानाच नितीन गडकरींना भोवळ

ब्रेकिंग : चीनमध्ये भीषण महापूर, 100,000 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी

नाशिक येथे पदवीधर व डिप्लोमा उत्तीर्णांसाठी अप्रेंटिस ची मोठी संधी

ब्रेकिंग : APMC शौचालय घोटाळा प्रकरणी संजय पानसरेंना अटक, सात कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय