Sunday, May 5, 2024
Homeजिल्हाShirur loksabha: शिरूर लोकसभेतून वंचितच्या उमेदवाराकडून अर्ज दाखल, वाचा कोण आहे उमेदवार...

Shirur loksabha: शिरूर लोकसभेतून वंचितच्या उमेदवाराकडून अर्ज दाखल, वाचा कोण आहे उमेदवार !

Shirur loksabha : शिरूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने आफताब अन्वर मकबूल शेख (Aftab Anwar Maqbool Shaikh) तर मावळमधून माधवी जोशी यांना शनिवारी (२० एप्रिल) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज आफताब अन्वर मकबूल शेख यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता शिरूर लोकसभा (Shirur loksabha) मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघात (Shirur loksabha) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाने) शिवाजीराव आढळराव-पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून आफताब अन्वर मकबूल शेख (Aftab Anwar Maqbool Shaikh) मैदानात आहे. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीला वंचितच्या उमेदवारांचा मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोण आहेत डॉ.अन्वर शेख ?

डॉ.अन्वर शेख यांनी पुना महाविद्यालयात प्राचार्य म्हणून अतिशय प्रभावी कामकाज पाहिले आहे. त्यांचा शिक्षण क्षेत्रात मोठा अनुभव आहे. आंबेडकरी चळवळीत त्यांचे मोठे योगदान राहिलेले आहे. त्यांनी गोरगरीब वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मोलाचे काम केले आहे.

या अगोदर वंचित बहुजन आघाडीने शिरूर लोकसभा मतदारसंघातून पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष विरोधी भूमिका घेतल्याने बांदल यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती. तसेच बांदल यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. अखेर पक्षाने त्यांची उमेदवारी रद्द केली.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा कोणकोणत्या केल्या घोषणा !

देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहे तरी कोण ?, वाचा सविस्तर !

भुजबळांनी नकार दिल्याने, आढळराव पाटलांना उमेदवारी डॉ.अमोल कोल्हेंच्या विधानाने खळबळ

धक्कादायक : बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास

रिझर्व्ह बँकेचे पुन्हा एका बॅंकेवर निर्बंध; तुमची तर बँक नाही ना?

व्हिडिओ : भाषण सुरू असतानाच नितीन गडकरींना भोवळ

ब्रेकिंग : चीनमध्ये भीषण महापूर, 100,000 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी

नाशिक येथे पदवीधर व डिप्लोमा उत्तीर्णांसाठी अप्रेंटिस ची मोठी संधी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय