Sunday, May 19, 2024
Homeताज्या बातम्याKanhaiya Kumar यांच्याकडून हवन, वाचा काय आहे कारण !

Kanhaiya Kumar यांच्याकडून हवन, वाचा काय आहे कारण !

Kanhaiya Kumar: जवाहरलाल विद्यापीठाचे माजी विद्यार्थी नेते आणि ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कन्हैया कुमार यांनी सोमवारी लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. उमेदवारी दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारने विविध धर्मनेत्यांची भेट घेत त्यांच्यासोबतचे एक छायाचित्र शेअर केले, ज्यामध्ये कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) हवन करताना आणि आंतरधर्मीय प्रार्थनांमध्ये भाग घेताना दिसला.

ईशान्य दिल्लीतील काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमारने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत दिल्ली काँग्रेसचे अनेक नेते तसेच आपचे नेते उपस्थित होते. उमेदवारी दाखल करताना त्यांच्यासोबत आप नेते गोपाल राय आणि नरेंद्र नाथही उपस्थित होते. यानंतर त्यांनी निवडणूक कार्यालयापासून रॅलीही काढली. यावेळी त्यांच्या हातात संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रतही होती.

कन्हैया कुमारने उमेदवारी दाखल करण्यापूर्वी हवन केले आणि सर्व धर्माच्या प्रार्थनांमध्ये भाग घेतला. २५ मे रोजी दिल्लीतील सर्व ७ लोकसभा जागांवर मतदान होणार आहे.

Kanhaiya Kumar

दिल्लीत काँग्रेस आम आदमी पक्षासोबत आघाडी करून लोकसभा निवडणूक लढवत आहे. जागावाटपाचा भाग म्हणून, काँग्रेस तीन जागांवर निवडणूक लढवत आहे, तर आपने दिल्लीतील चार मतदारसंघांतून उमेदवार उभे केले आहेत. राजधानीत नवी दिल्ली, दक्षिण दिल्ली, पूर्व दिल्ली, पश्चिम दिल्ली, चांदनी चौक, उत्तर पश्चिम आणि उत्तर पूर्व दिल्ली हे सात लोकसभा मतदारसंघ आहेत.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : दिंडोरीतून माकपचे उमेदवार जे पी गावित यांचा उमेदवारी अर्ज मागे

Amethi काँग्रेसच्या कार्यालयावर मध्यरात्री हल्ला, अनेक वाहनांची तोडफोड

Ajit Pawar यांच्याकडून रोहित पवार यांच्या रडण्याची नक्कल

‘तो’ प्रसंग सांगताना आमदार रोहित पवार यांना अश्रू अनावर

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ‘या’ भागात सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के

बीड लोकसभा मतदारसंघांतर्गत ‘या’ तारखांना करता येणार पोस्टल मतदान

भाजप उमेदवार कंगना राणौतची जीभ घसरली, भाजप नेत्यावरच केली टीका

अभिनेत्री कंगना राणौतचे अमिताभ बच्चन यांच्याबाबत मोठे विधान, म्हणाली…

देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठा कट रचल्याचा भाजप नेत्याचा गंभीर आरोप

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय