Monday, May 6, 2024
Homeताज्या बातम्याशिवसेना ठाकरे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय आहेत घोषणा !

शिवसेना ठाकरे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय आहेत घोषणा !

Thackeray Group Manifesto : शिवसेना ठाकरे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गुरुवारी (25 एप्रिल) सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेनं (ठाकरे गट) जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

ठाकरे यांनी, महाराष्ट्रावर केंद्राकडून होणाऱ्या अन्यायापासून मुक्ती देण्याचं आश्वासन दिलं. महाराष्ट्राला वित्तीय संस्थांचं केंद्र करणार असून देशात आणि राज्यात आमचं सरकार आल्यानंतर आम्ही दुजाभाव न करता सर्व राज्यांना समान विकासाची संधी देणार आहोत, तसेच महाराष्ट्रातून उद्योगधंदे बाहेर जात असून महाराष्ट्राचं वैभव पुन्हा प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही आश्वासन ठाकरेंनी दिलं.

जेव्हा आमची भाजपसोबत युती होती तेव्हा देखील आमचा वचननामा वेगळा होता. त्यामुळे यावेळी आम्ही आमचा वचननामा स्वतंत्र जाहीर केला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्या व्यक्तिरिक्त महाराष्ट्राच्या हिताचे जे मुद्दे आहेत ते आम्ही आमच्या वचननामा जाहीर करत आहोत, त्यामुळे आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आम्हाला हुकूमशाही संपवायची आहे. त्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे ठाकरे म्हणाले.

पुढे ते म्हणाले, युतीतला एक सहकारी पक्ष म्हणून तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे आम्ही गेलो होतो. तो क्षण माझ्या डोळ्यासमोर आहे. स्वत: राष्ट्रपतीसुद्धा आश्चर्यचकीत होते. देशाला आनंद आणि आश्चर्य वाटलं होतं. कारण बऱ्याच वर्षानंतर एका पक्षाची सत्ता आली होती. आम्ही एनडीए म्हणून एकत्र होतो. पण तेव्हाही भारतीय जनता पक्षाने बहुमताचा आकडा स्पर्श केला होता. त्यानंतर त्यांनी नोटबंदी केली. २०१९ मध्ये पुन्हा सत्तेवर आले. ३७० कलम हटवलं. तेव्हाही आम्ही सोबत होतो. आता मात्र त्यांना आता पाशवी बहुमत पाहिजे, जेणेकरुन ते देशाची घटनाच बदलून टाकतील. देशातील लोकशाही मारून टाकतील.

Thackeray Manifesto काय आहेत घोषणा?

शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार.
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन.
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे आश्वासन.
सरकारी विभागामध्ये महिलांना ५० टक्के जागा देण्यासाठी प्रयत्न करणार.
मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणार.
खते आणि बियाणांवरील, शेती उपकरणांवरील सर्व जीएसटी माफ करणार.
महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य पावलं उचलणार.
शेतकऱ्यांना धान्य ठेवण्यासाठी गोदामं बांधून देण्याचे आश्वासन.
पर्यावरणाचा धोका वाढवणाऱ्या प्रकल्पांना आम्ही राज्यात येऊ देणार नाही.
शेतकऱ्यांसाठी एक सर्व्हे सेंटर सुरु करणार, त्यामधून जगभरातील पिंकांबाबत व दरांबाबत मार्गदर्शन घेणार.
राज्यात डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आम्ही कटिबद्ध.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा कोणकोणत्या केल्या घोषणा !

’महामानव विश्वकाव्य दर्शन काव्यसंग्रह’ निर्मितीसाठी साहित्य पाठविण्याचे बार्टीकडून आवाहन

शिरूर लोकसभेसाठी 46 उमेदवारांचे 58 अर्ज

देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहे तरी कोण ?, वाचा सविस्तर !

भुजबळांनी नकार दिल्याने, आढळराव पाटलांना उमेदवारी डॉ.अमोल कोल्हेंच्या विधानाने खळबळ

धक्कादायक : बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास

रिझर्व्ह बँकेचे पुन्हा एका बॅंकेवर निर्बंध; तुमची तर बँक नाही ना?

व्हिडिओ : भाषण सुरू असतानाच नितीन गडकरींना भोवळ

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय