Monday, May 6, 2024
Homeजुन्नरJunnar: दिव्यांगांना ५ टक्के निधीचा लाभ मिळावा; श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्राची...

Junnar: दिव्यांगांना ५ टक्के निधीचा लाभ मिळावा; श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्राची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

Junnar: जुन्नर नगर पालिका क्षेत्रातील दिव्यांगांना ५ टक्के निधीचा लाभ मिळावा, यासाठी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी भोळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. (Junnar)

यावेळी दिव्यांगांना सन २०२० ते २४ या कालावधीचा ५ टक्के निधीचा जमा खर्च व दिव्यांग नावनोंदणी यादी, तसेच दिव्यांगांना मिळणाऱ्या विविध लाभाच्या योजना आदी विषयावर सविस्तर चर्चा केली.

लोकसभा निवडणुकीनंतर जुन्नर नगर पालिका हद्दीतील दिव्यांगांच्या बँक खात्यात ५ टक्के निधीचा लाभ जमा करण्यात येईल, असे आश्वासन मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी दिल्याची माहिती प्रहार रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्राचे संस्थापक अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी दिली.

मुख्याधिकारी भोळे यांनी ५ टक्के निधीची मंजुरी आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी झाली असल्याचे सांगून येत्या १५ मेनंतर दिव्यांगांच्या बॅंक खात्यात लाभाची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

यावेळी दिव्यांग कक्ष अधिकारी चित्रा औटी, सामाजिक कार्यकर्ते गणेश महाबरे, संघटनेचे अध्यक्ष अरुण शेरकर, सुनील जंगम, स्वप्नील लांडे, गोरक्ष नरवीर व दिव्यांग बांधव उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : माजी आमदार जे.पी.गावित यांना माकप कडून उमेदवारी जाहीर

मोठी बातमी : शिवसेना ठाकरे गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय आहेत घोषणा !

मोठी बातमी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा कोणकोणत्या केल्या घोषणा !

’महामानव विश्वकाव्य दर्शन काव्यसंग्रह’ निर्मितीसाठी साहित्य पाठविण्याचे बार्टीकडून आवाहन

शिरूर लोकसभेसाठी 46 उमेदवारांचे 58 अर्ज

देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहे तरी कोण ?, वाचा सविस्तर !

भुजबळांनी नकार दिल्याने, आढळराव पाटलांना उमेदवारी डॉ.अमोल कोल्हेंच्या विधानाने खळबळ

धक्कादायक : बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास

रिझर्व्ह बँकेचे पुन्हा एका बॅंकेवर निर्बंध; तुमची तर बँक नाही ना?

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय