Wednesday, May 1, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : भाजपला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे

PCMC : भाजपला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे

पिंपरी, चिंचवड विधानसभेत महाविकास आघाडीच्या आढावा बैठकीना उस्फुर्त प्रतिसाद PCMC

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : भाजपला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी आणि ज्येष्ठ लोकनेते शरद पवार व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ही वेळ आहे. त्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघातील (Maval loksabha 2024) महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करून त्यांना लोकसभेत पाठवण्याचा निश्चय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे.

मावळ लोकसभा निवडणुकीसाठी पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांच्या बैठका शुक्रवारी (दि.12) घेण्यात आल्या.

दापोडी, महेशनगर, पिंपरी, वाल्हेकरवाडी आणि किवळे येथील मुकाई चौक या ठिकाणी संजोग वाघेरे पाटील (Sanjog Waghere Patil) यांच्या उपस्थितीत बैठका झाल्या.


बैठकीस महाविकास आघाडीतील विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते.

महाविकास आघाडी (Maha vikas aghadi) बळकट करण्यासाठी सर्वांनी प्रचारात सामील व्हावे. भाजपने दिलेली खोटी आणि फसवी आश्वासने तसेच, वाढलेली महागाई, बेरोजगारी आदींबाबत नागरिकांपर्यंत विविध माध्यमातून माहिती पोहचवा. विरोधकांना ईडी, सीबीआयच्या दबाव तंत्राचा वापर करून भाजप आपली आसूरी ताकद वाढवत आहे. संविधान बदलण्यासाठी लोकशाहीचा अक्षरशः हत्या करून नवीन कायदे लादण्याचे काम सुरू आहे. या गोष्टी घराघरात पोहचवा, असे मार्गदर्शन प्रमुख पदाधिकार्‍यांनी केले. pcmc news

कोरोनाच्या संकट काळात तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्यावर आलेले संकट सक्षमपणे पेलले. त्यांनी अनेकांचे जीव वाचविले. राज्यभरात तातडीने कोविड रूग्णालय सुरू करून उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या. कुटुंबप्रमुख म्हणून उध्दव ठाकरे यांनी केलेल्या कामाचे जागातिक पातळीवर कौतुक झाले.

महाविकास आघाडीने केलेल्या कामाची माहिती नागरिकांन पर्यंत पोहचवा अश्या सूचना पदाधिकार्‍यांनी या वेळी दिल्या.

दरम्यान, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हेवेदावे बाजूला सारून एक दिलाने शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचे काम करण्याची ग्वाही यावेळी दिली. pcmc news

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : वंचितला मतदान न करण्याचे महात्मा गांधींच्या पणतूचे आवाहन

ब्रेकिंग : गांधी-आंबेडकरांचे पणतू पुन्हा आमने-सामने !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर, वाचा कुणाकुणाला मिळाली उमेदवारी !

मोठी बातमी : भाजप खासदाराच्या सुनेचे गंभीर आरोप, माझा उपभोगाची वस्तू म्हणून वापर

प्रचारा दरम्यान भाजप उमेदवाराने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल

जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या

ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू

माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय