Monday, May 20, 2024
Homeताज्या बातम्याNarendra Dabholkar: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप

Narendra Dabholkar: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप

Narendra Dabholkar : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणीचा मोठी अपडेट समोर येत आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातील न्यायालयाने ११ वर्षांनंतर आज निकाल दिला. डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी दोन आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी पुण्यातील न्यायालयाने शरद कळसकर आणि सचिन अंधुरे यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्यातील अन्य तीन आरोपींवरील आरोप सिद्ध न झाल्याने न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याकांडात एकूण ५ आरोपी होते, त्यापैकी दोन आरोपींना शिक्षा झाली तर तिघांची निर्दोष मुक्तता झाली. वीरेंद्र तावडे हा दाभोलकर हत्या प्रकरणाचा सूत्रधार मानला जात होता, मात्र, पुरावे सादर करण्यात सरकार अपयशी ठरल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

Narendra Dabholkar यांच्या हत्येचा कसा झाला उलगडा ?

बंगळुरूत पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणात कर्नाटकातील दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पुण्यातील चिंचवड परिसरातून अमोल काळे याला ताब्यात घेतले. काळे सनातन संस्थेशी संबंधित आहे. त्याच्याकडून नालासोपारा येथील वैभव राऊतची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याच्या घरातून शस्त्रे आणि स्फोटकांचा साठा जप्त केला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शरद कळसकरला ताब्यात घेतले. कळसकरने सचिन अंदुरेच्या मदतीने डॉ. दाभोलकर यांचा खून केल्याची कबुली दिली.

दरम्यान, पुण्यात डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर फेब्रुवारी 2015 मध्ये गोविंद पानसरे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती आणि त्याच वर्षी ऑगस्टमध्ये कोल्हापुरात कॉम्रेड एमएम कलबुर्गी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गौरी लंकेश यांची सप्टेंबर 2017 मध्ये बेंगळुरू येथील त्यांच्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीर

MPSC : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर

ब्रेकिंग : महाराष्ट्र कृषि सेवा (मुख्य) परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील शरद पवार यांचे मोठे विधान

राज्यात ११ मतदारसंघात अंदाजे ६१.४४ टक्के मतदान

बारामतीत पोलिसांच्या ‘बंदोबस्तात’ पैशांचा पाऊस ? रोहित पवारांचे गंभीर आरोप

‘EVM’ मशीनच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यास अटक

TMC : टाटा स्मारक हॉस्पिटल येथे भरती

मोठी बातमी : दिंडोरीतून माकपचे उमेदवार जे पी गावित यांचा उमेदवारी अर्ज मागे

Amethi काँग्रेसच्या कार्यालयावर मध्यरात्री हल्ला, अनेक वाहनांची तोडफोड

Ajit Pawar यांच्याकडून रोहित पवार यांच्या रडण्याची नक्कल

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय