Wednesday, May 22, 2024
HomeकृषीLivestock summercare विशेष लेख : उन्हाळ्यात जनावरांची "अशी" घ्या काळजी

Livestock summercare विशेष लेख : उन्हाळ्यात जनावरांची “अशी” घ्या काळजी

Livestock summercare : सध्या बऱ्याच भागात उन्हाळा तीव्र असल्यामुळे माणसांप्रमाणेच जनावरांनाही त्रास होतो. सामान्यतः उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याची कमतरता, तसेच म्हशींमध्ये उष्णतेस असणारी कमी प्रतिकारशक्ती यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनावर, शरीर पोषणावर व प्रजननक्षमतेवर परिणाम होतो. दूध देणाऱ्या जनावरांना थंड हवामान मानवते. जर जनावरे सतत उन्हाच्या संपर्कात येत असतील, तर त्याच्या आरोग्यावर परिणाम दिसून येतो. वाढत्या तापमानामुळे शरीराचे तापमान वाढते, चारा खाण्याचे प्रमाण कमी होते. पाणी पिण्याचे प्रमाण वाढते, दुधात घट होते. दिवसा म्हशी कमी चरतात आणि संध्याकाळी चरण्याकडे जास्त कल असतो, तसेच उष्णतेच्या वाढत्या प्रमाणाबरोबर जनावरांचे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढत जाते.Livestock summercare

उन्हाळ्यात छपरावर गवताचे आच्छादन टाकावे. शक्‍य असल्यास गोठ्याच्या बाजूंनी गोणपाटाचे किंवा पोत्याचे पडदे लोंबत ठेवून त्यावर पाणी फवारावे. जनावरांना पिण्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था आवश्‍यक आहे, शक्‍य झाल्यास त्यात मीठ व गूळ टाकावे. अशा प्रकारे व्यवस्थापन केल्यास उन्हाळ्यात होणारे कमी दूध उत्पादन वाढू शकते. गाईपेक्षा म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त होतो. उष्णता सहन करणाऱ्या घामग्रंथी म्हशीच्या कातडीत फार कमी असतात. सूर्यप्रकाश परावर्तित करण्यासाठी आवश्‍यक असणारी गाईसारखी कातडी असण्याऐवजी सूर्यप्रकाश काळ्या कातडीतून शोषला जाऊन म्हशीचे शारीरिक उष्णतामान वाढते म्हणून उष्णतेचा त्रास म्हशींना अधिक होतो व म्हशी माजावर येण्याचे प्रमाण बंद होते.Livestock summercareत्यामुळे म्हशींच्या शरीराचे तापमान योग्य ठेवण्यासाठी म्हशींच्या अंगावर पाण्याच्या फवाऱ्यांची व्यवस्था करावी, अशी व्यवस्था नसल्यास दिवसातून तीन-चार वेळा त्यांना पाण्याने धुवावे. दुपारच्या वेळी जनावरे गोठ्यामध्ये बांधावीत, या वेळेला ती सावलीत असणे गरजेचे आहे. गोठ्याच्या सभोवताली थंडावा राहण्यासाठी झाडे असणे आवश्‍यक आहे. उन्हाळ्यात छपरावर गवताचे आच्छादन टाकावे. शक्‍य असल्यास गोठ्याच्या बाजूंनी गोणपाटाचे किंवा पोत्याचे पडदे लोंबत ठेवून त्यावर पाणी फवारावे. जनावरांना पिण्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था आवश्‍यक आहे, शक्‍य झाल्यास त्यात मीठ व गूळ टाकावे. अशा प्रकारे व्यवस्थापन केल्यास उन्हाळ्यात होणारे कमी दूध उत्पादन वाढू शकते.Livestock summercare

उन्हाळ्यात गाई म्हशींना सारखी तहान लागते, त्यासाठी त्यांच्या पिण्याच्या पाण्याचे चोख व्यवस्थापन करावे लागते, गायी म्हशी या नाजूक असल्याने त्यांची जास्त काळजी घेणे गरजेचे असते कडक उन्हात त्यांना फिरवू नका, सकाळी किमान एक तास त्यांना चरायला न्यावे, नंतर गोठ्यात आणावे, दुपारी उष्णतेचा शरिरावर परिणाम होऊ शकतो. माणसारखी जनावरांना उन्हाळ्यात पाण्याची गरज जास्त असते.परंतु पाण्याचे तापमान जास्त असेल तर जरुरीपेक्षा कमी पाणी जनावरे पिताता. त्यामुळे दूध उत्पादनात घट होते. यासाठी पाण्याची साठवण आणि पाणी पिण्याची व्यवस्था सावलीत करावी. त्यांच्या पाण्याच्या टाक्या आच्छादित असाव्यात, शक्य असल्यास इतर मार्गानी पाणी थंड करून द्यावे. गायी-म्हशींना पाणी देताना ठराविक दोन आणि तीन वेळा पाणी पाजण्यापेक्षा दिवसभर पाण्याची उपलब्धता होईल असे पाहावे.Livestock summercare


चारा किंवा आहार कसा द्यावा

उन्हाळ्यात हिरवा चारा पुरेसा मिळत नाही, सर्वसाधारणपणे १० लिटर दुध देणाऱ्या गाई/ म्हशीस(वजन अंदाजे ४०० किलो) ६-८ किलो वाळलेला चारा,२५ किलो हिरवा चारा व ५-६ किलो खुराक खाद्य आवश्यक असते. वाळलेला चारा व हिरव्या चाऱ्याची कुट्टी केल्यास २५ % खाद्याची बचत होते. सर्वसाधारण जनावरांना त्यांच्या वजनाच्या २ ते २.५ % वाळलेला चारा लागतो. हायड्रोपोनिक्स पद्धतीने बनवलेला हिरवा चारा हा जनावरांसाठी खुपच उपयुक्त असे खाद्य आहे. आधुनिक तंत्रज्ञान व रासायिनक द्रव्यांंचा वापर करून पाण्यात तयार केलेले खाद्य जनावरांसाठी जास्त फायदेशीर व किफायतशीर ठरते. या खाद्याद्वारे जनावरांना आवश्यक प्रथिने, जीवनसत्त्वे मिळतात व त्याचा परिणाम दुध उत्पादन वाढीवर होतो. वाळलेल्या सुक्या चाऱ्याचा उपयोग पोषण आहारासाठी होतो. ओला चारा पोषण आहार दोन्हीसाठी फायद्याचा ठरतो.

खुराकामध्ये ऊर्जा भरपुर प्रमाणात असते, म्हणून आहारासाठी याचा वापर होतो. हिरवा चारा जसे घास, हिरवा मका, गवत, उसाचे वाढे इत्यादी या खाद्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो. हे त्यांना द्यावे, गाई हांबरल्या किंवा म्हैस घशातून ऑई असा आवाज काढू लागली की तिला खुराक हवा असे समजून घ्यावे, मालकाला आवाज काढून ती खुणावत असते. पशुखाद्य घरच्या घरी तयार करता येते,चाराटंचाईच्या काळात गहू किंवा भाताचे काडाचा वापर जनावरांच्या आहारात करावा. हा चारा अधिक रुचकर व पौष्टिक करण्यासाठी त्यावर युरिया, मीठ व गूळ यांचे द्रावण शिंपडावे. Livestock summercare

हायड्रोपोनिक्स पद्धतीने बनवलेला हिरवा चारा हा जनावरांसाठी खुपच उपयुक्त असे खाद्य आहे. आधुनिक तंत्रज्ञान व रासायिनक द्रव्यांंचा वापर करून पाण्यात तयार केलेले खाद्य जनावरांसाठी जास्त फायदेशीर व किफायतशीर ठरते. या खाद्याद्वारे जनावरांना आवश्यक प्रथिने, जीवनसत्त्वे मिळतात व त्याचा परिणाम दुध उत्पादन वाढीवर होतो. वाळलेल्या सुक्या चाऱ्याचा उपयोग पोषण आहारासाठी होतो. ओला चारा पोषण आहार व उत्पादन आहार दोन्हीसाठी फायद्याचा ठरतो. खुराकामध्ये ऊर्जा भरपुर प्रमाणात असते, म्हणून उत्पादन आहारासाठी याचा वापर होतो. हिरवा चारा जसे घास, हिरवा मका, गवत, उसाचे वाढे इत्यादी या खाद्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो.

गाई म्हशींना अंबोण खायला द्या

जनावरांच्या खाण्यात जीवनसत्वे (protein source) म्हणून सरकी, भुईमुग(groundnut), सूर्यफूल (Sunflower), तीळ, जवस, खोबरे, सोयाबीन (soybean) यांपासून मिळणारी पेंड वापरवी. प्रथिनांचा पुरवठा करण्यासाठी मका (maize), ज्वारी, बाजरी, ओट, तांदूळ (Rice) यांसारख्या तृणधान्यांचा भरडा वापरला जातो. तृणधान्य किंवा कडधान्य पिकांची काढणी केल्यानंतर मिळणारा भाताचा किंवा गव्हाचा कोंडा, भाताचे पॉलिश, कडधान्यापासून डाळी बनवताना मिळणारी तूर, उडीद, मूग, चना ईई सह भरडलेले धान्य – 25-30 टक्के, भरडलेल्या डाळी – 10-15 टक्के, धान्याचा कोंडा – 10-15 टक्के, कोरडी पेंड – 10-15 टक्के, तेलयुक्त पेंड – 15-20 टक्के, काकवी/गूळ – 1-2 टक्के, क्षार मिश्रणे – 1-2 टक्के, मीठ – 1 टक्के मिक्स करून आंबोण तयार होते. हे अंबोण चविष्ट असते त्यामुळे गाई म्हशी खुश होऊन खातात. त्यामुळे दुधाचे प्रमाण वाढते.Livestock summercare


गाई गुरांचे आजार लक्षणे उपचार

वाढत्या उन्हामुळे जनावरे भरपूर पाणी पितात. कोरडा चारा खात नाहीत. त्यांच्या हालचाली मंदावतात. अशावेळी जनावरे सावलीत किमान एक तास ठेवावीत, जनावरांच्या शरीराचे तापमान वाढलेले तापमान कमी होते, जोरात श्वास घेणे थांबते, अति उष्णतेमुळे जनावरांच्या नाकातून रक्तस्राव होत असतो. नाकातून लाल-गडद रंगाचे रक्त वाहते. जनावरांच्या डोक्यावर थंड पाणी ओतावे. भरपूर थंड पाणी पिण्यास द्यावे. हिरवा चारा द्यावा. जनावरे झाडाखाली किंवा गोठ्यात बांधावीत.गोठ्यात हवा खेळती असावी, गोठा शेणमुताने भरलेला नसावा, या दिवसात गाई म्हशींच्या पायाकडे लक्ष द्यावे, पायात जखमा किंवा फोडी आल्या आहेत का बघावे, अशावेळी जनावरे बसलेली असताना त्यांचे खुर शिंगे, शेपटी मऊ फडक्याने साफ करून घ्यावीत.

आठवड्यातून एकदा गाई म्हशींना अंघोळ घालावी, कपडे धुण्याचा मऊ ब्रश घेऊन त्यांचे ओटी पोट व सर्वांग खरारा करावे, त्यांना मालकाचे प्रेम मिळते,अनेक गोठ्यामध्ये सूर्यास्ताच्या वेळी सांजवात धूप घरी लावतो तसा गोठ्यात लावावा,किंवा सुरेल संगीत लावा. निश्चित तुमची गुरेढोरे ऐन उन्हाळ्यातही धश्ठपुष्ठ, रुबाबदार राहतील,त्यांची प्रतिकार शक्ती वाढेल,दूध भरपूर मिळेल. रक्तस्राव थांबत नसेल, तर पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने आहारातून जीवनसत्त्व क किंवा औषधाच्या माध्यमातून द्यावे.


विषबाधा
हिरव्या वैरणीच्या कमतरतेमुळे जनावरे मिळतील त्या हिरव्या वनस्पती खातात. यामुळे विषारी वनस्पती घाणेरी, गुंज, धोतरा खाण्यात येऊन विषबाधा होते. जनावरे गुंगल्यासारखी करतात, खात नाहीत, खाली बसतात, उठत नाहीत. पाय सोडून ताबडतोब मरतात. विषबाधेची लक्षणे दिसताच पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने उपाय करावेत.

उष्माघात
आजार अतिप्रखर सूर्य किरणे, पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेमुळे होतो. शरीराची कातडी कोरडी पडते, जनावरे थकल्यासारखी होतात, भूक मंदावते, दूध देणे कमी होते.

उपाय
जनावरांच्या अंगावर थंड पाणी ओतावे. ओले कापड किंवा गोणपाट जनावरांच्या डोक्यावर ठेवावे. त्यावर वारंवार पाणी मारावे. जनावरांना झाडाखाली, गोठ्यात बांधावे. भरपूर प्रमाणात स्वच्छ थंड पाणी, चारा द्यावा.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मतदारांनो ! तुम्ही सुध्दा जिंकू शकता बाईक, रेसींग सायकल आणि ॲन्ड्राईड मोबाईल

…आमच्यासाठी कचाकचा बटन दाबा; अजित पवार वादाच्या भोवऱ्यात

मोठी बातमी : सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यासाठी मोजावे लागणार पैसे

ब्रेकिंग : माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाला भीषण अपघात

मोठी बातमी : “या” दोन बँकांतून पैसे काढण्यावर निर्बंध; तुमची बँक तर नाही ना?

ब्रेकिंग : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर पोलिस आणि नक्षलवाद्यांत मोठी चकमक, २९ नक्षलवाद्यांचा खात्मा

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या 109 जागांसाठी भरती

तुमचे गाव पेसा क्षेत्रात आहे का ? असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची !

लाख रुपयांचे सोयाबीनची चोरी; जुन्नर तालुक्यातील घटना

Junnar : वादळी वाऱ्यात ठिणगी पडून २५ जनावरांचा मृत्यू; तर २ जण गंभीर

जुन्नर : “ये आदिवासी कोळपाटांनो..” म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 4 जणांवर अ‍ॅट्रॉसिटी दाखल

मोठी बातमी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय