Social Media X : जेव्हापासून टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X चे (पूर्वीचे ट्विटर) मालक बनले आहेत, तेव्हापासून सोशल मीडिया X मध्ये सातत्याने बदल केले जात आहेत. आता पुन्हा एलोन मस्क यांनी X संदर्भात मोठी घोषणा केली आहे. ज्यानुसार आतापासून यूजर्सना सोशल मीडियावर (Social Media X) पोस्टिंगसाठीही पैसे द्यावे लागणार आहेत.
टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांनी सोशल मीडिया X चे सुत्रे हाती घेतल्यापासून सर्वप्रथम त्यांनी ट्विटरचे नाव बदलून एक्स केले. नंतर लोगो बदलला. त्यानंतरही अनेक बदल करण्यात आले. आता मस्कने अशा बदलांशी संबंधित एक मोठी घोषणा केली आहे. आता एक्स नवीन वापरकर्त्यांना पोस्टिंगसाठी पैसे आकारण्याच्या विचारात होते.
कंपनी नवीन X वापरकर्त्यांवर हे शुल्क लादण्याचा विचार करत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिणे, लाईक करणे, बुकमार्क करणे आणि पोस्टला उत्तर देणे यासाठी पैसे द्यावे लागतील. X चे मालक इलॉन मस्क यांनी आपल्या हँडलवरील एका यूजरच्या पोस्टला उत्तर देताना हे सांगितले आहे. मात्र यासाठी किती शुल्क आकारले जाणार आहे आणि ते कधी आकारले जाणार याबाबत सध्या X कडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
मस्कने या संदर्भात पोस्टमध्ये लिहिले आहे की, नवीन वापरकर्ते तीन महिन्यांच्या कालावधीनंतर थोडे शुल्क भरून विनामूल्य पोस्ट करू शकतात. या नवीन नियमानंतर बॉट्स आणि बनावट खात्यांद्वारे ट्रोल्सची संख्या कमी होऊ शकते.
X-संबंधित समस्यांवर चर्चा करणाऱ्या फोरम X-News च्या मते, कंपनीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंड आणि फिलिपाइन्समध्ये या धोरणाची चाचणी आणि अंमलबजावणी केली. त्याची वार्षिक फी एक डॉलर ठेवण्यात आली होती.
हे ही वाचा :
ब्रेकिंग : माजी मंत्री डॉ. परिणय फुके यांच्या वाहनाला भीषण अपघात
मोठी बातमी : “या” दोन बँकांतून पैसे काढण्यावर निर्बंध; तुमची बँक तर नाही ना?
ब्रेकिंग : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर पोलिस आणि नक्षलवाद्यांत मोठी चकमक, २९ नक्षलवाद्यांचा खात्मा
UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या 109 जागांसाठी भरती
तुमचे गाव पेसा क्षेत्रात आहे का ? असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची !
लाख रुपयांचे सोयाबीनची चोरी; जुन्नर तालुक्यातील घटना
Junnar : वादळी वाऱ्यात ठिणगी पडून २५ जनावरांचा मृत्यू; तर २ जण गंभीर
जुन्नर : “ये आदिवासी कोळपाटांनो..” म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी 4 जणांवर अॅट्रॉसिटी दाखल
मोठी बातमी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी
महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार
मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय काय आहेत आश्वासने!
Live मॅच मध्ये कॅच पकडायला गेला अन् पँन्ट खाली आली, रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल
CBIC : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत मोठी भरती
मोठी बातमी : कन्हैया कुमार लोकसभेच्या मैदानात, या ठिकाणाहुन लढणार निवडणूक
अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका
वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला