Tuesday, April 30, 2024
Homeजिल्हाPune : माॅरिशस येथील मराठी विश्व साहित्य संमेलनात बाळासाहेब तोरस्कर सन्मानित

Pune : माॅरिशस येथील मराठी विश्व साहित्य संमेलनात बाळासाहेब तोरस्कर सन्मानित

Pune/ राजेंद्रकुमार शेळके : मॉरीशस मध्ये शब्द साहित्य संस्थेतर्फे नुकतेच आठव्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात सोळांकुर येथील जेष्ठ कवी बाळासाहेब तोरस्कर यांना त्यांच्या साहित्यातील योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

हाॅटेल ली ग्रँड ब्लू, कोस्टल रोड, माॅरिशस येथे संमेलनाध्यक्ष जेष्ठ साहित्यिक प्राचार्य अनिल गजभिये इंदोर यांच्या हस्ते व उद्घाटक आंतरराष्ट्रीय चित्रकार विजय राऊत, मराठी भाषा अभ्यासक प्रकाश निर्मळ पुणे, साहित्यिक दगडू लोमटे, गझलकार सिध्दार्थ भगत, शब्द परिवाराचे अध्यक्ष संजय सिंगलवार, कवी कृषिभूषण दिपक आसेगांवकर पुसद, कवी डॉ. राजेंद्र राठोड, शब्दच्या उपाध्यक्षा शशी डंभारे, कवी डॉ.अनिल काळबांडे, या मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह श, सन्मानपत्र देऊन तोरस्करांना सन्मानित करण्यात आले. Pune

तोरस्कर हे अ.भा.मराठी साहित्य परिषद पुणे चे ठाणे विभागीय अध्यक्ष, राष्ट्रीय शिक्षक संचेतना राष्ट्रीय प्रवक्ते व काव्यप्रेमी शिक्षक मंचचे राज्य सल्लागार सदस्य, जायंट गृप आॅफ कोल्हापूर मेट्रोचे माजी अध्यक्ष व साहित्य संपदा दिवाळी अंकाचे निवासी संपादक, कृषिराज दिवाळी अंकाचे उपसंपादक आहेत. त्यांचे “प्रीतफुले” व “वाळवंटातील झरे” हे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले असून त्यांना अनेक राज्यस्तरीय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय साहित्यिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

सातासमुद्रापार मराठी साहित्याचा झेंडा मागील आठ वर्षापासून जागतिक शब्द मराठी साहित्य संमेलना निमित्ताने रोवला गेला. बँकाँक, दुबई, इंडोनेशिया, मलेशिया, श्रीलंका, मालदी, नेपाळ नंतर आता माॅरिशसमध्ये या शब्द मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होेते. या संमेलनासाठी महाराष्ट्रातून ५० साहित्यिक उपस्थित होते. या साहित्य संमेलनात परिसंवाद, गझल मुशायरा, कविसंमेलन, शोध निबंध वाचन, चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रम आदी उत्साहात पार पडले.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय काय आहेत आश्वासने!

Live मॅच मध्ये कॅच पकडायला गेला अन् पँन्ट खाली आली, रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल

मोठी बातमी : कन्हैया कुमार लोकसभेच्या मैदानात, या ठिकाणाहुन लढणार निवडणूक

अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका

वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला

ब्रेकिंग : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय केल्या नवीन घोषणा !

…म्हणून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यायला हवा; कपिल पाटीलांचे शरद पवारांना पत्र

मोठी बातमी : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

धक्कादायक : अनैतिक संबंधला अडथळा ठरत असल्याने गाडी अंगावर घालून तरुणाचा खून

मोठी बातमी : वंचितचे उमेदवार वसंत मोरे घेणार राज ठाकरेंची भेट, मोरे पुन्हा मनसेत जाणार?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय