Tuesday, April 30, 2024
Homeजिल्हाPune : रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; घरफोडी करणारे चोरटे जेरबंद

Pune : रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; घरफोडी करणारे चोरटे जेरबंद

Pune / राजेंद्रकुमार शेळके : मौजे रांजणगांव, ता. शिरुर, जि. पुणे गावचे हद्दीतील पुणे-अहमदनगर हायवे रोड लगत असलेल्या हॉटेल अमरईन मधील काउंटर मधुन रात्रीचे वेळी दोन मोबाईल व ३० हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरुन नेले बाबत रांजणगाव एमआयडीसी स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. Pune

सदर गुन्हयांचा पोलीस स्टेशन कडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार हे तपास करीत असतांना घटनास्थळ व हायवे वरील १५० सी.सी.टि.व्ही. कॅमेरे तपासून तसेच तांत्रीक विश्लेषन व गोपनीय माहितीचे आधारे तपास करुन इसम रेहान रमजान लदाफ, (वय-२० वर्षे, रा. नुरानी मस्जीद जवळ, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) व झैद नईम शेख (वय-२१ वर्षे, रा.आर. के. चौक, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) यांना अटक करण्यात आली होती. हत्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी अशा प्रकारचे रांजणगांव पोलीस स्टेशन हद्दीतील ३ घरफोडीचे गुन्हे व मंचर पोलीस स्टेशन हद्दीतील १ घरफोडीचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली.

त्यांचेकडुन वरील गुन्हयांतील चोरस गेलेले २ मोबाईल फोन व ९ हजार रुपये रोख रक्कम तसेच गुन्हा करतांना वापरलेली ४० हजार रुपये किंमतीचे वाहन असा एकूण ७० हजार ५२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधीकारी शिरुर विभाग शिरुर श्री.ढोले व रांजणगांव पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, उमेश कुतवळ, विजय शिंदे, पो.हवा. नागरगोजे यांनी केला असून सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सहाय्यक फौजदार गायकवाड, पो.हवा. मोरे करीत आहेत.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार

मोठी बातमी : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय काय आहेत आश्वासने!

Live मॅच मध्ये कॅच पकडायला गेला अन् पँन्ट खाली आली, रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल

मोठी बातमी : कन्हैया कुमार लोकसभेच्या मैदानात, या ठिकाणाहुन लढणार निवडणूक

अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका

वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला

ब्रेकिंग : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय केल्या नवीन घोषणा !

…म्हणून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यायला हवा; कपिल पाटीलांचे शरद पवारांना पत्र

मोठी बातमी : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

धक्कादायक : अनैतिक संबंधला अडथळा ठरत असल्याने गाडी अंगावर घालून तरुणाचा खून

मोठी बातमी : वंचितचे उमेदवार वसंत मोरे घेणार राज ठाकरेंची भेट, मोरे पुन्हा मनसेत जाणार?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय