Wednesday, May 1, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : शिवतेजनगर चिंचवड येथे भव्यदिव्य नागपंचमी उत्सव 

PCMC : शिवतेजनगर चिंचवड येथे भव्यदिव्य नागपंचमी उत्सव 

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान, शिवतेजनगर, चिंचवड येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी नागपंचमी उत्सव साजरा करण्यात आला. प्रतिष्ठानच्या वतीने ६ फुट उंचीची नागप्रतिमा तयार केली असून जिवंत नागाऐवजी नागप्रतिमेची पुजा करावी, असा संदेश देण्यात आला. (Nagpanchami festival at Chinchwad)

Nagpanchami festival at Chinchwad

या ठिकाणी महिलांसाठी उंच झोका बांधण्यात आला होता. झोका फुगडी, उखाणे व इतर पारंपरिक पद्धतीने खेळाचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता नागप्रतिमेचे पुजन तारा बहिरवाडे, अंजली देव, सारिका रिकामे, क्षमा काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

श्री स्वामी समर्थ महिला मंडळाच्या वतीने अनेक पारंपारिक खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमास महिलांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. 

Nagpanchami festival at Chinchwad

सदर कार्यक्रमाचे नियोजन महिला मंडळाच्या अंजली देव, सारिका रिकामे, क्षमा काळे, नीलिमा भंगाळे, श्रद्धा बहिरवाडे, गीता पाटील, प्रीती झोपे, मीरा बिरादार, स्नेहल खडके, सविता राणे, दिपाली योगी, छाया सातपुते, मोहिनी शिराळकर, अश्विनी केवळकर, मनीषा भडंगे, नेहा अहिरे व मंगल काळे यांनी परिश्रम घेतले.

यावेळी सर्व महिलांनी महाराष्ट्रातील दुष्काळी स्थिती आणि चिंतेत असलेल्या बळीराजाच्या शेतात पाऊस पडू दे, अशी आर्त प्रार्थना नागदेवतेच्या पूजनप्रसंगी केली.

बँक नोट मुद्रणालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी!

बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत 499 पदांची भरती; ऑनलाईन करा अर्ज 

BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत भरती; ऑनलाईन करा अर्ज! 

ICAR : नागपूर येथे NBSSLUP अंतर्गत लिपिक, सहाय्यक पदांची भरती

धुळे येथे मनरेगा अंतर्गत 100 पदांची भरती; 8वी, 10वी उत्तीर्णांना संधी! 

कृषी सहसंचालक कोल्हापूर विभागात 250 रिक्त पदांची भरती 

NFSC : नागपूर येथे नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती 

ZP : पालघर जिल्हा परिषद अंतर्गत 991 पदांची भरती, ऑनलाईन करा अर्ज 

ZP : कोल्हापुर जिल्हा परिषद अंतर्गत 728 पदांची भरती; ऑनलाईन करा अर्ज ! 

Krishi Vibhag : कृषी सेवक पदाच्या 952 जागांसाठी भरती 

Nagpanchami festival at Chinchwad
Nagpanchami festival at Chinchwad
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय