Wrinkled Jujube : सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांमध्ये आपल्याला नेहमीच्या फळांपेक्षा वेगळी फळ पाहायला मिळतात. त्यात आंबट गोड आंभेळी, डोंगरची मैना करवंद, आणि गोड व रुचकर अशी तोरणं होय..
स्थानिक नाव : तोरण, तोरणी
शास्त्रीय नाव : Ziziphus rugosa l.
इंग्रजी नाव : Wild Jujube, Kotta, Wrinkled Jujube, Zunna Berry
संस्कृत नाव : बदरा
कुळ : Rhamnaceae
उपयोगी भाग : पिकलेले फळ
उपलब्धीचा काळ : पिकलेले फळ : एप्रिल-मे
झाडाचा प्रकार : काटेरी झुडूप
अभिवृद्धी : बिया
वापर : पिकलेले फळ, बिया भाजून
आढळ :
तोरणाचे काटेरी झुडूप महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम घाटातील ठराविक जंगलात वाढलेले दिसते. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, तसेच पश्चिम घाटातील पुणे, नाशिक, नगर, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तोरणाचे झुडूप रस्त्याच्या कडेला, डोंगरकपारीला वाढलेले दिसते. काही भागात या काटेरी झुडपांचा शेताच्या भोवती तसेच परसबागेला कुंपण बनविण्यासाठी वापर केला जातो. साधारण एप्रिल-मे महिन्यात स्थानिक लोक गावाच्या बाजारात पानाच्या द्रोणामध्ये तोरणाची पिकलेली गोड, मधुर अशी लहान लहान फळे विकायला घेऊन बसतात. या फळांना चांगली मागणी असते. Wrinkled Jujube
वनस्पतीची ओळख :
तोरणाचे सदाहरित, काटेरी झुडूप साधारण ९ ते १० मीटरपर्यंत उंच वाढते. तांबूस, कोवळ्या फांद्यावर नाजूक लव असून एकेरी किंवा दुहेरी काटे असतात. काटे काहीशे मागे वाकलेले असून ३ ते ५ मी.मी. लांब असतात.
जुन्या फांद्या लालसर तांबूस रंगाच्या, खरखरीत, पट्टे किंवा खोबण्या असणाऱ्या असतात. पाने साधारण ८ ते १० सें.मी. लांब व ५ ते ८ सें.मी. रुंद असून मोठी व लंबवर्तुळाकार, काहीशी सुरकुतलेली व टोकाशी निमुळती तर कधी गोलाकार होत गेलेली असतात. कोवळी पाने लालसर तांबूस रंगाची व लवयुक्त कालांतराने हिरवी होऊन ३ ते ५ शिरायुक्त असतात. पानाचा देठ साधारण १ ते १.५ सें.मी. लांब. १० ते २० फुले फांदीच्या टोकाशी किंवा पानाच्या देठाच्या बेचक्यातून गर्दीने येणारी असतात. फुलांना पाकळ्या नसून त्याचा बाह्यदल फिक्कट पिवळ्या रंगाचा असतो तर देठ १ सें.मी. पर्यत लांब असते.
फळे ५ ते ८ मिमी व्यासाचे व लंबगोलाकार साधारण १ सें.मी. लांब असते. फळे कच्ची असताना लालसर हिरवी व पिकल्यावर पांढरी होतात. हा पांढरा गर खाण्यासाठी मधुर लागतो. फळाच्या आत एक लहान बी पांढरट रंगाची असते.
साधारण डिसेंबर, जानेवारी महिन्यांत तोरणाच्या काटेरी जाळीवर अगदी लहान लहान फुले येऊ लागतात. तर एप्रिल-मे महिन्यात ही फळे पिकून खाण्यास योग्य बनतात.
औषधी उपयोग :
तोरणाच्या पानाचा, सालीचा, फुलांचा औषध म्हणून उपयोग होतो. सालीपासून बनवलेली पेस्ट रक्ताभिसरण सुधारणा आणि वेदना कमी करण्यात येणारा शेक बनविण्यासाठी करतात. तसेच सुजलेल्या हिरड्या व दातदुखी थांबण्यासाठी लावतात. सालीची पावडर शुद्ध तुपासोबत मिसळून तोंड आलेल्या जागी तसेच गालफुगीवर लावतात.
इतर उपयोग :
तोरणाची पिकलेली पांढरी फळे खाण्यासाठी अतिशय मधुर असतात. त्याच्या बियाही भाजून खाल्ल्या जातात. तोरणाचे लाकूड अतिशय मजबूत व कडक असते. त्यामुळे त्यापासून शेतीची अवजारे बनवली जातात. पानाचा वापर चिरुट बनवण्यासाठी केला जातो. तसेच शेळ्यांना चारा म्हणून केला जातो. हे झुडूप काटेरी असल्यामुळे अनेक ठिकाणी फांद्यांचा वापर कुंपणासाठी केला जातो.
सूचना : सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
हे ही वाचा :
मोठी बातमी : कन्हैया कुमार लोकसभेच्या मैदानात, या ठिकाणाहुन लढणार निवडणूक
अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवठा केला, आढळराव पाटीलांची टीका
वसंत मोरेंच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी दिली अशी प्रतिक्रिया की एकच हशा पिकला
ब्रेकिंग : भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, वाचा काय केल्या नवीन घोषणा !
…म्हणून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यायला हवा; कपिल पाटीलांचे शरद पवारांना पत्र
मोठी बातमी : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार
धक्कादायक : अनैतिक संबंधला अडथळा ठरत असल्याने गाडी अंगावर घालून तरुणाचा खून
मोठी बातमी : वंचितचे उमेदवार वसंत मोरे घेणार राज ठाकरेंची भेट, मोरे पुन्हा मनसेत जाणार?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान
ब्रेकिंग : वंचितला मतदान न करण्याचे महात्मा गांधींच्या पणतूचे आवाहन
ब्रेकिंग : गांधी-आंबेडकरांचे पणतू पुन्हा आमने-सामने !