Junnar (आनंद कांबळे) : श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा. क्रीडा व युवा सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा द्वारे आयोजित राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेत श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील १२ कॉमर्सचा विद्यार्थी कु श्रेयश राजेश कदम यांची उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर पुढे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी (६८ वी शालेय हॅण्डबॉल स्पर्धा) १९ वर्षा खालील मुलांच्या महाराष्ट्र राज्याच्या संघात त्याची निवड झाली. (Junnar)
या उज्वल यशाबद्दल जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड संजय शिवाजीराव काळे व अध्यक्ष प्रतिनिधी प्रा विलास कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महादेव वाघमारे, उपप्राचार्य डॉ. रवींद्र चौधरी व ज्युनिअर महाविद्यालयाच्या समन्वयक प्रा प्रतिभा लोढा, पर्यवेक्षक प्रा. समीर श्रीमंते, प्रबंधक प्रा मनीषा कोरे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत श्रेयस कदम व त्याचे वडील राजेश कदम, आई कविता कदम व मार्गदर्शक प्रशिक्षक डॉ. अनिल बढे, प्रा मयूर बोंबले यांचा विशेष सत्कार करण्यात आला व श्रेयस कदमला पुढील स्पर्धेसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.
सदर स्पर्धेसाठी स्पर्धा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम दि. ५ डिसें रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव या ठिकाणी होणार आहे. व दि ११ डिसेंबर रोजी लुधियाना पंजाब येथे सुरु होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचा संघ सहभागी होणार आहे. महाराष्ट्राच्या या संघात पुणे जिल्ह्यातून निवड झालेला कु श्रेयस कदम हा एकमेव विद्यार्थी आहे. त्यामुळे त्याचे सर्वच स्तरातून विशेष कौतुक होत आहे.
(Junnar)


हे ही वाचा :
ईडीने पोर्न निर्मितीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणावर राज कुंद्राच्या घरावर छापे टाकले
PCMC : औद्योगिक गुणवत्ता स्पर्धा २०२४ मध्ये ३५ कंपन्यांतील ३०७ स्पर्धकांचा सहभाग
Cold wave : महाराष्ट्रात थंडीची लाट, पुणे 9.9°C
PCMC : भारतीय संविधान हा मानवतेचा जाहिरनामा; महापालिका आयोजित परिसंवादात वक्त्यांचा सूर
PCMC : लेवा भ्रातृ मंडळाच्या वतीने डिजिटल संस्कार शिबिराचे आयोजन