Thursday, October 10, 2024
Homeग्रामीणJunnar : केवाडी येथे 29 वर्षीय युवकाची आत्महत्या

Junnar : केवाडी येथे 29 वर्षीय युवकाची आत्महत्या

Junnar, (रफिक शेख) : जुन्नर तालुक्यातील केवाडी येथील 29 वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सचिन रामदास लांडे यांनी त्यांच्या राहत्या घरात बेडरूममध्ये लोखंडी तुळईला दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना 16 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 10:00 वाजता ते 17 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9:00 वाजेच्या दरम्यान घडली. (Junnar)

सचिन यांना घरातील सदस्यांनी तात्काळ खाली उतरवून जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच जुन्नर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक सुरकुले करत असून सहाय्यक फौजदार गिझरे यांनी नोंद घेतली आहे. अशी माहिती जुन्नर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक अवचर यांनी दिली आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका लांबणीवर, वाचा काय आहे कारण !

सोयाबीनवरील विषाणुजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन

श्री विलेपार्ले केळवणी मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, धुळे अंतर्गत भरती

‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’द्वारे ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र भेटीची इच्छा शासन पूर्ण करणार

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत भरती

संबंधित लेख

लोकप्रिय