Junnar /आनंद कांबळे : शाळेतील मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप वातावरणासाठी शाळेत तयार करण्यात आलेल्या सखी सावित्री मंचच्या वतीने मुलींना गुड टच, बॅड टच याबाबत प्रबोधन करत असताना मुलींच्या सुरक्षिततेसाठी कोणताच टच नको असे सांगत ‘डोन्ट टच’ चे धडे देण्यात आले.
यावेळी शाळेतील उपक्रमशील शिक्षक सयाजीराव चिखले म्हणाले की, लहान मुलींना कोणत्याच स्पर्शाचे ज्ञान या वयात नसते. मुलींना कोणता स्पर्श हा गुड टच आणि बॅड टच आहे, हे समजण्यात अडचण निर्माण होण्याची शक्यता असल्याने किंवा गुड टच क्षणात बॅड टच होण्याची भीती असल्याने यापुढे आपल्या शरीराला कोणाचाच स्पर्श नकोय या हेतूने “डोन्ट टच” चे धडे विद्यार्थिनींना देण्यात आले आहेत. (Junnar)
शाळेतील आदर्श शिक्षिका धनश्री दाते यांनी यावेळी मुलींना गुड टच, बॅड टच कोणकोणते आहेत याबाबत मार्गदर्शन केले. आपल्या घरातील आई, वडील, आजी, आजोबा यांचे स्पर्श आणि इतरांचे स्पर्श याबाबत माहिती दिली. आपल्या सुरक्षिततेसाठी आपले कुटुंब दक्ष असल्याने यापुढे अंगाला कोणी इतर व्यक्ती किंवा नातेवाईक स्पर्श करत असेल तेव्हा मोठ्याने ‘डोन्ट टच’ बोलावे असे सांगण्यात आले. (Junnar)
यावेळी सखी सावित्री मंच अध्यक्ष आरती भोर, सदस्य उज्वला आहेर, आरती वाबळे, सारिका रणदिवे, मुख्याध्यापिका मंदाकिनी शिंदे, सयाजीराव चिखले, दत्तात्रेय साबळे, पुनाजी पारधी, माणिक बोऱ्हाडे, रोहिणी बांबळे, धनश्री दाते आदी उपस्थित होते.
नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शाळेचे मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उचललेल्या दक्षतेबाबत गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, गटशिक्षण अधिकारी अनिता शिंदे, विस्तार अधिकारी संचिता अभंग, केंद्रप्रमुख जयश्री वायकर यांनी कौतुक केले.
हेही वाचा :
कंगना राणावतचे शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान, भाजपने झटकले हात
गटप्रवर्तकांना चार हजारांची वाढ असमाधानी ; पुन्हा आंदोलनाची घोषणा
बार्टीच्या ७६३ पात्र विद्यार्थ्यांना १०० टक्के अधिछात्रवृत्ती
ब्रेकिंग : गटप्रवर्तकांच्या मानधनात चार हजार रुपयांची वाढ
Indian Army : भारतीय सैन्य दल अंतर्गत भरती; पात्रता 10वी
मोठी बातमी : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना
मोठी बातमी : कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर ; केंद्र सरकारकडून युनिफाइड पेन्शन योजनेला मंजूरी