Sunday, May 19, 2024
Homeजिल्हा5 हजारांची लाच घेताना महिला भूमापक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

5 हजारांची लाच घेताना महिला भूमापक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

नाशिक : तक्रारदराने खरेदी केलेल्या प्लॉटच्या रेकॉर्डवरील जुन्या मालकाचे नाव कमी करून दुसऱ्या नावाची नोंद करण्यापोटी 5 हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सिन्नरच्या भूमी अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापक महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. प्रतिभा दत्तात्रय करंजे (वय 42) असे महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की, सिन्नर तालुक्यातील मनेगाव येथील तक्रारदाराने सिटी सर्व्हे नंबर 197, 198 व 199 असे तीन प्लॉट पत्नीच्या नावाने खरेदी केले होते. त्यावरील जुने मालकाचे नाव कमी करून तक्रारदार यांच्या पत्नीचे नवीन नाव लावण्यासाठी सिन्नरच्या भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज सादर केला होता. नवीन नावाची नोंदणी व जुने नाव कमी करण्यासाठी परीरक्षण भूमापक प्रतिभा करंजे यांनी 5 हजार रुपये लाचेची मागणी करून ती कार्यालयात स्विकारली.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक विश्वजीत जाधव, हवालदार प्रकाश डोंगरे, संतोष गांगुर्डे, प्रणय इंगळे, महिला पोलीस शिपाई शीतल सूर्यवंशी सहभागी झाले होते.

हे ही वाचा :

मोठी बातमी : १२ आमदारांसदर्भात सर्वोच्च न्यायालाचा मोठा निर्णय

‘एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्रता होणार…’ विधान विधानसभेच्या उपाध्‍यक्षचं वक्तव्य

ब्रेकिंग : १२ आमदारांबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

खळबळजनक : ऑनलाइन जंगली रमी हरल्याने पुण्यात तरूणाची आत्महत्या

ऐकावे ते नवलच : टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दुकानावर चक्क बाऊन्सर तैनात

टोमॅटोने मोडले आता पर्यतचे पेट्रोल डिझेलचे सर्व रेकॉर्ड, अनेक शहरांत टोमॅटो 150 पार

ऑनलाईन गेम खेळताना प्रेम जडलं, 4 मुलांची आई प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात

अखेर ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या लेखकाने मागितली प्रेक्षकांची जाहीर माफी

धक्कादायक : मंत्र्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना तब्बल दोन तास रस्त्यावर केले उभे

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय