Sunday, May 19, 2024
Homeराज्यखळबळजनक : ऑनलाइन जंगली रमी हरल्याने पुण्यात तरूणाची आत्महत्या

खळबळजनक : ऑनलाइन जंगली रमी हरल्याने पुण्यात तरूणाची आत्महत्या

पुणे : ऑनलाइन जंगली रमी गेमची आपल्याला मोठ्या प्रमाणात जाहिरात बघायला मिळत आहे. कमी वेळेत जास्त पैसा कमवायच्या नादात अनेक जण ऑनलाईन गेमला बळी पडत आहे. मोबाईलमध्ये पैसे कमावण्यासाठी अनेक ऑनलाईन गेमचे शिकार बनत आहेत. अशाच आता एक खळबळजणक घटना समोर आली आहे.

पुण्याच्या तळेगाव दाभाडेमध्ये ऑनलाइन जंगली रमीमध्ये (Online Junglee Rummy) पैसे हरल्याने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गणेश सोमनाथ काळदंते असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गणेश हा कॅब चालक असून त्याची स्वत:ची गाडी आहे. त्याला ऑनलाइन जंगली रमी खेळण्याचे व्यसन लागले होते. गणेश रमी खेळत असताना वीस हजार रूपये हरला होता. त्यामुळे ते तणावाखाली होता.

रविवारी गणेशने घरात सर्वजण असताना स्वतःच्या बेडरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री गणेश बाहेर न आल्याने बेडरुमचा दरवाजा तोडला असता गणेशने आत्महत्या केल्याचे दिसले. ऑनलाइन जंगली रमीमध्ये वीस हजार हरल्याने त्याने गळफास घेतला अशी माहिती तळेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी दिली आहे.

हे ही वाचा :

ऐकावे ते नवलच : टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दुकानावर चक्क बाऊन्सर तैनात

टोमॅटोने मोडले आता पर्यतचे पेट्रोल डिझेलचे सर्व रेकॉर्ड, अनेक शहरांत टोमॅटो 150 पार

ऑनलाईन गेम खेळताना प्रेम जडलं, 4 मुलांची आई प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात

अखेर ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या लेखकाने मागितली प्रेक्षकांची जाहीर माफी

धक्कादायक : मंत्र्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना तब्बल दोन तास रस्त्यावर केले उभे

‘हा आपल्या दोघांतील मुलभूत फरक’ खा. कोल्हेंचे आढळराव पाटील यांना प्रत्यूत्तर

ब्रेकिंग : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ठाकरे गटाच्या बड्या महिला नेत्या शिंदे गटात

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार?

ब्रेकिंग : 9 आमदार आणि 3 खासदार निलंबित; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोडी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय