Friday, May 17, 2024
HomeNewsअखेर ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या लेखकाने मागितली प्रेक्षकांची जाहीर माफी

अखेर ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या लेखकाने मागितली प्रेक्षकांची जाहीर माफी

मुंबई : आदिपुरुष चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाल्यापासून चित्रपट वादात अडकला होता. चित्रपटाच्या ट्रेलर नंतर VFX वरून झालेल्या वादानंतर निर्मित्यांनी त्यात सुधारणा करत असल्याचे सांगत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलली होती. मात्र आता VFX आणि इतर बदल करूनही चित्रपट पुन्हा वादात अडकल्याचे बघायला मिळाले. अखेर आता चित्रपटाच्या लेखकाने प्रेक्षकांची जाहीर माफी मागितली आहे.

आदिपुरुष चित्रपट सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात होता. क्रिती सेनन आणि प्रभासच्या या रामायणावर आधारित चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. मात्र चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक निराश झाले. प्रेक्षकांनी चित्रपटाच्या जवळजवळ प्रत्येक गोष्टीवर आक्षेप घेण्यात आला. चित्रपटाच्या लेखक, दिग्दर्शक, निरमातये यांना ट्रोल करण्यात आले. प्रेक्षकांना कलाकारांचे लूक, व्हीएफएक्स, डायलॉग अशा बऱ्याच गोष्टी खटकल्या होत्या. त्यानंतर चित्रपटातील संवाद बदलण्यात आले. दरम्यान आता चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशिर यांनी इंस्टाग्राम वर पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे.

मनोज यांनी सोशल मीडियावर लिहिले की, आदिपुरुषामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हे मी मान्य करतो. हात जोडून मी तुम्हा सर्व बंधू-भगिनी, वडीलधारी मंडळी, आदरणीय ऋषी-संत आणि श्रीरामाच्या भक्तांची मनापासून माफी मागतो. भगवान बजरंगबली आम्हा सर्वांना आशीर्वाद द्या. एक आणि अखंड बनून पवित्र सनातन धर्म आणि महान देशाची सेवा करण्याचे सामर्थ्य द्या.

ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष या चित्रपटाचे बजेट तब्बल 600 कोटी रुपयांचे होते. या चित्रपटाने जगभरात 400 कोटींची कमाई केली. तर भारतात या चित्रपटाने 286 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

हे ही वाचा :

धक्कादायक : मंत्र्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना तब्बल दोन तास रस्त्यावर केले उभे

‘हा आपल्या दोघांतील मुलभूत फरक’ खा. कोल्हेंचे आढळराव पाटील यांना प्रत्यूत्तर

ब्रेकिंग : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ठाकरे गटाच्या बड्या महिला नेत्या शिंदे गटात

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार?

ऑनलाईन गेम खेळताना प्रेम जडलं, 4 मुलांची आई प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात

ब्रेकिंग : 9 आमदार आणि 3 खासदार निलंबित; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोडी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय