Saturday, May 18, 2024
Homeराजकारणधक्कादायक : मंत्र्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना तब्बल दोन तास रस्त्यावर केले उभे

धक्कादायक : मंत्र्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना तब्बल दोन तास रस्त्यावर केले उभे

जळगाव : अजित पवार राष्ट्रवादीमध्ये बंड करून शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहे. अजित पवार यांच्या सोबत अन्य ८ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शपथविधी नंतर पहिल्यांदाच अनेक मंत्री आपल्या मतदार संघात गेले त्यावेळी कार्यकर्त्यांकडून त्यांचे दोरदार स्वागत करण्यात आले. मात्र जळगाव जिल्ह्यात मंत्र्यांच्या स्वागतासाठीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अजित पवार यांच्यासह मंत्रीपदाची शपथ घेतलेले नवनिर्वाचित मंत्री आपल्या गावी आले. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली. परंतु जळगाव जिल्ह्यात मंत्री अनिल पाटील यांच्या मतदारसंघात त्यांच्या स्वागतासाठी शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावर उभे करण्यात आल्याची धक्कादायकबाब समोर आली आहे. त्यांच्या ताफ्याच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांना रस्त्याच्या कडेने ओळीने उभे करून तर काहींना खाली बसवून ठेवण्यात आले.

अमळनेरचे आमदार अनिल पाटील कॅबिनेट मंत्री झाले आहे. त्यांचा ताफा येण्या आधी दोन ते अडीच तास अमळनेर येथील एस एस पाटील आश्रमशाळेच्या विद्यार्थीना रस्त्यावर उभे करण्यात आले होते. मंत्र्यांची वाट पाहत विद्यार्थी रस्त्यावर उन्हात उभे होते. जास्त वेळ उभे राहून थकल्यामुळे विद्यार्थी शेवटी जमिनीवर बसून गेले. ताफा आल्यावर विद्यार्थ्यांना सलाम करायला लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या संतापजनक प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही आश्रमशाळा भाजपचे माजी आमदार बी एस पाटील यांच्या शैक्षणिक संस्थेची असल्याची माहिती समोर आली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनिल पाटील आणि अजित पवार गटाच्या नेत्यांवर टीकेचा सूर उमटला असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

हे ही वाचा :

‘हा आपल्या दोघांतील मुलभूत फरक’ खा. कोल्हेंचे आढळराव पाटील यांना प्रत्यूत्तर

ब्रेकिंग : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ठाकरे गटाच्या बड्या महिला नेत्या शिंदे गटात

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार?

ऑनलाईन गेम खेळताना प्रेम जडलं, 4 मुलांची आई प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात

ब्रेकिंग : 9 आमदार आणि 3 खासदार निलंबित; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोडी

मोठी बातमी : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, मनसेकडून प्रस्ताव ?

आदिवासी मजुरावर लघुशंका : भाजप नेत्यास अटक ; घरावर बुलडोझर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय