Saturday, May 18, 2024
Homeआंतरराष्ट्रीयऑनलाईन गेम खेळताना प्रेम जडलं, 4 मुलांची आई प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात

ऑनलाईन गेम खेळताना प्रेम जडलं, 4 मुलांची आई प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात

नवी दिल्ली : प्रेमात लोक काय करतील सांगता येत नाही. प्रेम, संगीत, कला या अशा गोष्टी आहेत ज्याला कुठल्याही सीमा अडवू शकत नाही. जातीच्या भिंती, धर्माच्या भिंती, वयाच्या भिंती, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कौटुंबिक वैराच्या भिंती तुटतात, शिवाय इतर देशांच्या भिंतीही प्रेमासमोर तुटतात, भले हे देश भारत-पाकिस्तान असले तरी. अशीच एक प्रेम कथा आता समोर आली आहे. ऑनलाईन गेम खेळताना प्रेमात पडलेली महिला आपल्या प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात आल्याची माहिती समोर आली आहे.

2020 साली PUBG खेळताना पाकिस्तानमधील 27 वर्षीय महिला एका भारतीयाच्या प्रेमात पडली. 4 मुलांची आई प्रियकराला भेटण्यासाठी घर विकून बेकायदेशीरपणे भारतात आली. सीमा हैदर आणि सचिनची ही प्रेमकहाणी आहे. मात्र आता ते कायद्याच्या कचाट्यात अडकले आहे.

सीमा हैदर (२७) या पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील खैरपूर येथील रहिवासी आहेत. पती सौदी अरेबियात कामाला आहे. दोघांमधील संबंध सुरुवातीपासून विशेष चांगले नव्हते. कौटुंबिक हिंसाचार हा सीमाच्या आयुष्याचा एक भाग बनला. पती छोट्या छोट्या गोष्टीवरून तिला मारहाण करायचा. दरम्यान तो कामासाठी सौदी अरेबियाला गेला. सीमाच्या म्हणण्यानुसार ती 4 वर्षांपासून तिच्या पतीला भेटलेली नाही.

2020 मध्ये कोरोना महामारीदरम्यान PUBG खेळताना दोघांची ऑनलाइन भेट झाली होती. हळूहळू सीमाच्या आयुष्यात सचिनचा प्रवेश झाला. ते दोघेही प्रेमात पडले. पहिल्या नजरेत प्रेम व्हावं तसं त्यांच ऑनलाईन प्रेम जुळले. सीमाने तिच्या प्रियकरासोबत सेटल होण्याचा निर्णय घेतला. 22 वर्षीय सचिन ग्रेटर नोएडा येथील एका किराणा दुकानात काम करतो.

सचिनला भेटण्यासाठी ती यावर्षी जानेवारी महिन्यात पाकिस्तानहुन दुबई आणि तिथून नेपाळला पोहोचली. सचिन आणि सीमाची पहिली भेट नेपाळमध्ये झाली. तिथे त्यांनी एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली. नेपाळचा व्हिसा घेऊन मे महिन्यात ती आपल्या 4 मुलांसह (3 मुली आणि एक मुलगा) तेथे पोहोचली. काठमांडूला उतरल्यानंतर ती बसने पोखराला गेली. त्याच्याकडे भारताचा व्हिसा नव्हता, त्यामुळे कुणालाही संशय येऊ नये म्हणून बस सतत बदलत राहिली. त्यानंतर तिथून तिने भारतात प्रवेश केला. ती ग्रेटर नोएडा येथे प्रियकर सचिनसोबत सुमारे दीड महिन्यांपासून राहत होती.

सचिनने सीमाकडे राहण्यासाठी भाड्याची खोली घेतली. हैदर त्याची पत्नी असल्याचे घरमालकाला सांगितले. दोघेही पती-पत्नीसारखे एकत्र राहू लागले. सीमा जेव्हा लग्नाबद्दल बोलू लागते तेव्हा सचिन त्याच्या कुटुंबियांसमोर कबूल करतो की तो सीमावर प्रेम करतो आणि त्याला तिच्याशी लग्न करायचे आहे. कुटुंबीयांनी लग्नासाठी होकार दिला पण नंतर कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून आधी कायदेशीर सल्ला घेण्यास सांगितले. कारण सीमा पाकिस्तानातून आली होती आणि तिच्याकडे भारताचा व्हिसाही नव्हता.

दरम्यान, नोएडा पोलिसांनी सांगितले की, हरियाणातील पलवल येथून महिला आणि तिच्या मुलांना पकडले आहे. सध्या नोएडा पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा या महिलेची चौकशी करत आहेत. अतिरिक्त पोलिस उपायुक्त (झोन III) अशोक कुमार सिंह यांनी सांगितले की, रबुपुरा भागातील एका किराणा दुकानात काम करणाऱ्या सचिनची PUBG गेमद्वारे पाकिस्तानातील कराची येथील रहिवासी सीमा गुलाम हैदरशी मैत्री झाली होती.

हे ही वाचा :

ब्रेकिंग : 9 आमदार आणि 3 खासदार निलंबित; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोडी

मोठी बातमी : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, मनसेकडून प्रस्ताव ?

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये मोठे बदल, अध्यक्षपदी “या” नेत्याची केली निवड

उध्दव ठाकरेंना धक्का; दोन निष्ठावंतांचा शिंदे गटात प्रवेश

आदिवासी मजुरावर लघुशंका : भाजप नेत्यास अटक ; घरावर बुलडोझर

ब्रेकिंग : अजित पवारांच्या सरकारमधील सहभागानंतर शिंदे गट ॲक्शन मोडवर, केला “हा” निर्धार

आनंदाची बातमी : गाई पाळा अन् मिळवा तब्बल ‘इतके’ लाख अनुदान; सरकारने सुरू केली ‘ही’ योजना

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय