Thursday, March 27, 2025
---Advertisement---
---Advertisement---

उध्दव ठाकरेंना धक्का; दोन निष्ठावंतांचा शिंदे गटात प्रवेश

नाशिक : नांदगाव विधानसभा मतदार संघातील उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे निष्ठावंत माजी आमदार राजेंद्र देशमुख आणि अल्ताफ खान यांनी आपल्या समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला. बुधवारी (दि.५) रात्री मुंबई येथे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.

---Advertisement---

त्यांच्या या प्रवेशानंतर मनमाड शहर उध्दव सेनेला मोठा धक्का बसला असून आपण विकासाच्या मुद्यावर आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली यापुढे नांदगाव मतदारसंघात शिवसेनेचे प्रामाणिकपणे काम करू, अशी ग्वाही माजी आमदार देशमुख यांनी दिली. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे शिंदे गटात स्वागत करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, फरहान खान, मयूर बोरसे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles