Friday, May 3, 2024
Homeराजकारणमोठी बातमी : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, मनसेकडून प्रस्ताव...

मोठी बातमी : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, मनसेकडून प्रस्ताव ?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत सर्वांनाच धक्का दिला. तेव्हा पासून राज्यातील राजकारणात रोज नव नव्या घडामोडी घडत आहे. बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याची ईच्छा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावेत म्हणून कार्यकर्त्यांनी मुंबई आणि ठाण्यात बॅनर्स लावले होते. या पार्श्वभुमीवर नव्या राजकीय हालचालींना वेग आला असून मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट भाजपसोबत गेल्यामुळे मनसेकडून ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला गेला आहे. मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी दैनिक सामनाच्या कार्यालयात जाऊन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राऊत यांना युतीचा प्रस्ताव दिल्याचं सांगितलं जात आहे.

मात्र, अभिजीत पानसे यांनी माझं वैयक्तिक काम होतं म्हणून मी भेटलो. युतीचा प्रस्ताव घेऊन यायला मी एवढ्या मोठ्या पदावर नाही. मी राज ठाकरे यांचा कट्टर सैनिक आहे. या सर्व विषयांवर राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरेच उत्तर देतील. मी माझ्या वैयक्तिक कामासाठी आलो आहे. त्याचं टू प्लस टू फोर करू नका, असं अभिजीत पानसे म्हणाले.

हे ही वाचा :

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये मोठे बदल, अध्यक्षपदी “या” नेत्याची केली निवड

उध्दव ठाकरेंना धक्का; दोन निष्ठावंतांचा शिंदे गटात प्रवेश

आदिवासी मजुरावर लघुशंका : भाजप नेत्यास अटक ; घरावर बुलडोझर

ब्रेकिंग : अजित पवारांच्या सरकारमधील सहभागानंतर शिंदे गट ॲक्शन मोडवर, केला “हा” निर्धार

आनंदाची बातमी : गाई पाळा अन् मिळवा तब्बल ‘इतके’ लाख अनुदान; सरकारने सुरू केली ‘ही’ योजना

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय