Saturday, May 18, 2024
Homeराजकारण'हा आपल्या दोघांतील मुलभूत फरक' खा. कोल्हेंचे आढळराव पाटील यांना प्रत्यूत्तर

‘हा आपल्या दोघांतील मुलभूत फरक’ खा. कोल्हेंचे आढळराव पाटील यांना प्रत्यूत्तर

पुणे : एकीकडे राज्यात नवीन राजकीय समीकरणे जुळत असतानाच शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजकारण चांगलेच तापले आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर काही वैयक्तिक टीका केल्या होत्या. या टीकेला खा. कोल्हे यांनी दोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.

शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी जबाब मिलेगा, करारा जबाब ! असं, म्हणत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. खा. कोल्हे म्हणाले, मी तुमच्या वयाचा आदर ठेवतोय, चार वेळा तुम्हाला उद्धव ठाकरेंनी लोकसभेचे तिकिट दिले, त्यामुळे तुम्ही खासदार झाला. त्यांच्या अडचणीच्या काळात स्वतःच्या स्वार्थापोटी त्यांची साथ सोडून निघून गेलात. दरम्यान, शरद पवार यांनी मला फक्त २०१९ मध्ये एकदाच लोकसभेचे तिकिट दिले. आज त्यांच्या अडचणीच्या काळात मी त्यांच्यासोबत उभा आहे. हा आपल्या दोघांतील फरक आहे. अमोल कोल्हे यांनी समाज माध्यमावर व्हिडिओ पोस्ट करत ही टीका केली आहे.

कोल्हे म्हणाले, “तुम्ही माझ्या अभिनयाची कुचेष्टा केली. अभिनय माझ्या चरितार्थाचे साधन आहे. अभिनय माझा छंद आहे. शिरूरच्या जनतेला माहित आहे की माझी अमेरिकेत कुठेही कंपनी नाही. जनतेने विश्वासाने मला लोकसभेत पाठवले. त्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन लोकसभेत मी फक्त संरक्षणविषयक प्रश्न उपस्थित करून माझ्या कंपनीचे उखळ पांढरे करून घेत नाही. तशी चर्चा कुठेही शिरुरमध्ये होत नाही. मी माझे छंद चार माणसांत उजळमाथ्याने सांगू शकतो. तशी आपल्या छंदाची परिस्थिती आहे का, असा अडचणीचा प्रश्न विचारून आपल्यासारख्या वयस्कर माणसाची गोची करू इच्छीत नाही, तसेच २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारात मी तुमचा प्रचार केला होता याचेही वाईट वाटले. असेही कोल्हे म्हणाले.

हे ही वाचा :

ब्रेकिंग : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ठाकरे गटाच्या बड्या महिला नेत्या शिंदे गटात

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार?

ऑनलाईन गेम खेळताना प्रेम जडलं, 4 मुलांची आई प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात

ब्रेकिंग : 9 आमदार आणि 3 खासदार निलंबित; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोडी

मोठी बातमी : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, मनसेकडून प्रस्ताव ?

आदिवासी मजुरावर लघुशंका : भाजप नेत्यास अटक ; घरावर बुलडोझर

ब्रेकिंग : अजित पवारांच्या सरकारमधील सहभागानंतर शिंदे गट ॲक्शन मोडवर, केला “हा” निर्धार

आनंदाची बातमी : गाई पाळा अन् मिळवा तब्बल ‘इतके’ लाख अनुदान; सरकारने सुरू केली ‘ही’ योजना

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय