Sunday, May 19, 2024
Homeराजकारणमोठी बातमी : १२ आमदारांसदर्भात सर्वोच्च न्यायालाचा मोठा निर्णय

मोठी बातमी : १२ आमदारांसदर्भात सर्वोच्च न्यायालाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील १२ राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बाबतीत मोठी बातमी समोर येत आहे. विधानपरिषदेवर राज्यपालांनी नियुक्त करावयाच्या १२ आमदारांवरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. त्यामुळे आता १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाविकास आघाडी सरकारने राज्यात सत्तेवर आल्यानंतर राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली होती. मात्र राज्यपालांनी या यादीवर काहीच निर्णय घेतला नव्हता. या प्रकरणी राज्य सरकारने न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतरही राज्यपालांनी कोणताच निर्णय घेतला नव्हता.

गेल्यावर्षी सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी यादी पाठवली होती. नंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते. त्यानंतर न्यायालयात राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या स्थगिती वरील निर्णय अडकून पडला होता. आज सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने १२ आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठवली आहे. त्यामुळे आता राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, राज्यातील सत्ता बदलानंतर याबाबत एक वेगळी याचिका दाखल करण्यात आली होती. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आधीची यादी परत पाठवली. हे कृत्य नियमात बसणारं नाही, असं सांगत न्यायालयात आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती.

हे ही वाचा :

‘एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्रता होणार…’ विधान विधानसभेच्या उपाध्‍यक्षचं वक्तव्य

ब्रेकिंग : १२ आमदारांबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

खळबळजनक : ऑनलाइन जंगली रमी हरल्याने पुण्यात तरूणाची आत्महत्या

ऐकावे ते नवलच : टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दुकानावर चक्क बाऊन्सर तैनात

टोमॅटोने मोडले आता पर्यतचे पेट्रोल डिझेलचे सर्व रेकॉर्ड, अनेक शहरांत टोमॅटो 150 पार

ऑनलाईन गेम खेळताना प्रेम जडलं, 4 मुलांची आई प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात

अखेर ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या लेखकाने मागितली प्रेक्षकांची जाहीर माफी

धक्कादायक : मंत्र्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना तब्बल दोन तास रस्त्यावर केले उभे

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय