Tuesday, May 7, 2024
Homeराजकारण‘एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्रता होणार…’ विधान विधानसभेच्या उपाध्‍यक्षचं वक्तव्य

‘एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्रता होणार…’ विधान विधानसभेच्या उपाध्‍यक्षचं वक्तव्य

मुंबई : राज्यातील राजकीय समीकरणे संपुर्ण बदलली आहे. अजित पवार यांच्यासह अनेक आमदारांनी शिंद – फडणवीस सरकार सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सरकार आणखी भक्कम झाल्याचे बोलले जात आहे. असे असताना मात्र एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.

अजित पवार यांच्या गटासोबत असलेले विधान विधानसभेचे उपाध्‍यक्ष नरहरि झिरवळ यांनी महत्वाचे विधान केले आहे. सर्व बाजूने विचार केला, तर शिवसेनेचे ते १६ आमदार अपात्र आहेत, असे विधान पत्रकारांशी बोलतांना झिरवळ यांनी केले आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील कारवाई सुरू केली आहे. त्यासाठी शिंदे आणि ठाकरे गटाच्या दोन्ही आमदारांना विधानसभा अध्‍यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस देऊन आपले म्हणणे सात दिवसांत मांडण्यास सांगितले आहे.

पत्रकारांशी बोलताना नरहरि झिरवळ म्हणाले, सर्व बाजूने विचार केला, तर शिवसेनेचे ते १६ आमदार अपात्र आहेत, पण हा निर्णय शेवटी अध्‍यक्षांकडे असेल. त्‍यांच्‍याकडे शेवटचे अधिकार आहेत. त्‍यामुळे मी त्‍याच्‍यावर वक्‍तव्‍य करणे उचित ठरणार नाही, असेही ते म्हणाले. अपात्रतेची निर्णयप्रक्रिया चालू झाल्‍यावर नरहरि झिरवळ यांच्‍या या वक्‍तव्‍याला महत्त्व प्राप्‍त झाले आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षांकडून आलेल्या नोटिसीवर सात दिवसांत उत्तर सादर करायचे आहे, पण शिंदे गटाला मात्र आणखी मुदतवाढ हवी आहे. मुदतीत उत्तर सादर न केल्यास आपले काहीच म्हणणे नाही असे समजून निर्णय घेतला जाईल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटिसीत नमूद केले आहे.

हे ही वाचा :

ब्रेकिंग : १२ आमदारांबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

खळबळजनक : ऑनलाइन जंगली रमी हरल्याने पुण्यात तरूणाची आत्महत्या

ऐकावे ते नवलच : टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दुकानावर चक्क बाऊन्सर तैनात

टोमॅटोने मोडले आता पर्यतचे पेट्रोल डिझेलचे सर्व रेकॉर्ड, अनेक शहरांत टोमॅटो 150 पार

ऑनलाईन गेम खेळताना प्रेम जडलं, 4 मुलांची आई प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात

अखेर ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या लेखकाने मागितली प्रेक्षकांची जाहीर माफी

धक्कादायक : मंत्र्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना तब्बल दोन तास रस्त्यावर केले उभे

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय