Friday, May 17, 2024
Homeराजकारणब्रेकिंग : १२ आमदारांबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

ब्रेकिंग : १२ आमदारांबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली : महाविकास आघाडी सरकारने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे १२ जणांची नावे पाठवली होती. मात्र, कोश्यारी यांनी त्यांना मंजुरी दिली नव्हती. या प्रकरणावर उद्या सुनावणी होणार आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचे पत्र महाविकास आघाडी सरकारने तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना कोश्यारी यांनी या नावांना मंजुरी देण्यास सातत्याने टाळाटाळ केली. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने नवी यादी राज्यपालांना पाठवली होती.

शिंदे – फडणवीस सरकारने जुनी यादी रद्द करून नव्या यादीला मंजूर देण्याबाबत आक्षेप घेऊन सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर उद्या (मंगळवारी) सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांच्या पीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे.

सप्टेंबर २०२२ पासून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तींना न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. ही स्थगिती उठणार की कायम राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा :

खळबळजनक : ऑनलाइन जंगली रमी हरल्याने पुण्यात तरूणाची आत्महत्या

ऐकावे ते नवलच : टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दुकानावर चक्क बाऊन्सर तैनात

टोमॅटोने मोडले आता पर्यतचे पेट्रोल डिझेलचे सर्व रेकॉर्ड, अनेक शहरांत टोमॅटो 150 पार

ऑनलाईन गेम खेळताना प्रेम जडलं, 4 मुलांची आई प्रियकरासाठी थेट पाकिस्तानातून भारतात

अखेर ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या लेखकाने मागितली प्रेक्षकांची जाहीर माफी

धक्कादायक : मंत्र्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना तब्बल दोन तास रस्त्यावर केले उभे

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय