Thursday, May 9, 2024
Homeनोकरीपर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवी उत्तीर्णांना...

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत विविध पदांची भरती; 10वी, पदवी उत्तीर्णांना संधी 

MTDC Recruitment 2023 : महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) च्या सांस्कृतिक कार्य विभाग (Cultural Affairs Department) च्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील खालील गट – ब (अराजपत्रित) व गट – क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Maha Sanskruti Bharti)

पद संख्या : 39

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सहाय्यक अधिक्षक (गट-क) : कला, विज्ञान, वाणिज्य, कायदा, अभियांत्रिकी किंवा कृषी यातील पदवी किंवा त्याच्या समतुल्य म्हणून शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता.

2) कनिष्ठ अभियंता (गट-क) : शासन मान्यताप्राप्त संस्थेचे स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य म्हणुन मान्यता मिळालेली अशी इतर कोणतीही अर्हता.

3) जतन सहायक (गट-क) : शासन मान्यताप्राप्त संस्थेचे स्थापत्य अभियांत्रिकी विषयात पदविका किंवा पदवी किंवा त्याच्या समकक्ष म्हणून शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता.

4) तंत्र सहायक (गट-क) : प्राचीन भारतीय इतिहासात पदव्युत्तर पदवी किंवा त्याच्या समकक्ष म्हणून शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता, किंवा प्राचीन भारतीय इतिहास किंवा संस्कृती, किंवा मध्ययुगीन भारतीय इतिहास विषयासह इतिहासात पदव्युत्तर पदवी, किंवा संस्कृत किंवा पाली आणि प्राकृत विषयात पदव्युत्तर पदवी.

5) मार्गदर्शक व्याख्याता (गट- क) : माध्यमीक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा त्याशी समतुल्य मान्यताप्राप्त परीक्षा उत्तीर्ण.

6) उप आवेक्षक (गट-क) : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आणि शासनाद्वारे मान्यताप्राप्त इमारत पर्यवेक्षणातील (Bulding Supervision) कोर्समध्ये प्रमाणपत्र उत्तीर्ण.

7) छायाचित्रचालक (गट-क) : 01) माध्यमिक शालेय प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण किंवा त्याच्या समकक्ष म्हणून शासनाने घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. आणि 02) कोणत्याही शासन मान्यताप्राप्त संस्थेचे फोटोग्राफीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.

8) अभिलेखाधिकारी गट-ब (अराजपत्रित) : ज्याने कला शाखेची इतिहास विषयाची “आधुनिक भारताचा इतिहास” या मुख्य विषयासह किमान द्वितीय वर्गातील पदवी धारण केली आहे.

9) फार्शीज्ञात संकलक (गट- क) : ज्याने कला शाखेची इतिहास हा मुख्य विषय घेऊन फारसी विषयासह किमान व्दितीय श्रेणीतील पदवी धारण केलेली आहे.

10) रसायनशास्त्रज्ञ (गट-क) : ज्याने विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र या मुख्य विषयासह पदवी धारण केली आहे.

11) संशोधन सहाय्यक (गट- क) : ज्याने कला शाखेची इतिहास विषयातील आधुनिक भारताचा इतिहास या पेपरसह किमान व्दितीय श्रेणीतील पदवी धारण केली आहे.

12) संकलक (गट-क) : ज्याने कला शाखेची इतिहास विषयातील आधुनिक भारताचा इतिहास या पेपरसह किमान व्दितीय श्रेणीतील पदवी धारण केली आहे.

13) सहाय्यक छायाचित्रकार (गट-क) : 01) महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मंडळाने घेतलेली विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा किमान दुसऱ्या श्रेणीत उत्तीर्ण केलेली असावी. 02) मान्यताप्राप्त संस्थेचे छायाचित्रणातील प्रमाणपत्र किंवा तत्सम अर्हता आवश्यक.

14) ग्रंथपाल लिपिक- नि-भांडारपाल (गट-क) : 01) ज्याने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण केली आहे. 02) ज्याने ग्रंथालय शास्त्राची पदविका धारण केली आहे.

15) अभिलेख परिचर (गट-क) : ज्याने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

16) तंत्रज्ञ मदतनीस (गट-क) : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

17) अधिक्षक (गट-ब अराजपत्रित) : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अर्हता उत्तीर्ण.

18) सहायक (गट-क) (कार्यालय- सां. कार्य) : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अर्हता उत्तीर्ण.

19) सहायक संशोधन -अधिकारी (गट-ब अराजपत्रित) : अर्थशास्त्र, इतिहास किंवा समाजशास्त्र यामधील स्नातक पदवी धारण केलेली आहे.

20) सहायक (गट-क) (कार्यालय- दर्शनिका) : अर्थशास्त्र, इतिहास किंवा समाजशास्त्र यामधील स्नातक पदवी धारण केलेली आहे.

21) टिप्पणी सहायक (गट-क) : पदवी धारण केलेली असावी.

वयोमर्यादा : 15 ऑगस्ट 2023 रोजी 18 वर्षे ते 40 वर्षे [मागासवर्गीय / आर्थिकदृष्टया दुर्लब घटक – 05 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय /आर्थिकदृष्टया दुर्लब घटक/अनाथ / दिव्यांग / माजी सैनिक – 900/- रुपये]

नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 सप्टेंबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

Lic
LIC
LIC
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय