Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : सोमनाथ शिनगारे यांना गुळाचा चहा विषयावर पीएचडी प्रदान

PCMC : सोमनाथ शिनगारे यांना गुळाचा चहा विषयावर पीएचडी प्रदान

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : मोशी येथील सोमनाथ बाळासाहेब शिनगारे यांना दि थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी पॅरिस फ्रांस या विद्यापीठाने पीएचडी पदवी बहाल केली. श्री शिनगारे यांनी “बिझनेस मॅनेजमेंट रेफरन्स जॅगरी टी प्री-मिक्सेस” या क्षेत्रामध्ये डॉक्टरेट पदवी मिळवली. थेम्स विद्यापीठातून श्री शिनगारे हे गुळाचा चहा (jaggery tea) या विषयामध्ये पदवी मिळविणारे पहिलेच भारतातील उद्योजक आहेत. यासाठी प्रा. राकेश मित्तल यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. pcmc news

थायलंड येथे झालेल्या आशिया- पॅसिफिक शैक्षणिक परिषदेत, आदीपू विद्यापीठाचे प्रमुख डॉ जिदप्पा थेवारिन, थेम्स विद्यापीठाचे ॲकॅडमीक संचालक डॉ इर्विन डेलीन टोरस यांच्या हस्ते हि पदवी बहाल करण्यात आली. pcmc news

यावेळी श्री. शिनगारे म्हणाले की, मी शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनांसाठी काहीतरी करावे.असे सतत वाटत होते. यासाठी उसापासून बनवलेल्या गुळावर संशोधन केले.

औद्योगिक क्षेत्रातील १३ वर्षाच्या अनुभवानंतर २०१९ साली गुळाचा चहा क्षेत्रात उडी घेतली. जॅगरीटेल्स या नावाने प्रीमिक्स उत्पादने बाजारात आणले.

आज १३ राज्यातील ३५० आऊटलेटवर चहा प्रेमी गुळाच्या चहाचा आस्वाद घेत आहे.
यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दीड हजार तरुणांना रोजगार मिळाला आहे. आरोग्यास हितकारक असलेल्या गुळाच्या चहाचा जगभर प्रसार करण्याचा मानस आहे. pcmc news

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील शरद पवार यांचे मोठे विधान

राज्यात ११ मतदारसंघात अंदाजे ६१.४४ टक्के मतदान

बारामतीत पोलिसांच्या ‘बंदोबस्तात’ पैशांचा पाऊस ? रोहित पवारांचे गंभीर आरोप

‘EVM’ मशीनच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यास अटक

TMC : टाटा स्मारक हॉस्पिटल येथे भरती

मोठी बातमी : दिंडोरीतून माकपचे उमेदवार जे पी गावित यांचा उमेदवारी अर्ज मागे

Amethi काँग्रेसच्या कार्यालयावर मध्यरात्री हल्ला, अनेक वाहनांची तोडफोड

Ajit Pawar यांच्याकडून रोहित पवार यांच्या रडण्याची नक्कल

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय