Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडव्हिडिओ : सार्वजनिक उद्योग हे देशाची मंदिरे – कॉम्रेड सी.श्रीकुमार

व्हिडिओ : सार्वजनिक उद्योग हे देशाची मंदिरे – कॉम्रेड सी.श्रीकुमार

पुणे / क्रांतिकुमार कडुलकर : भारतात स्वातंत्र्यानंतर खनिज, कोळसा, तेल, वायू, इंधन, दळणवळण, हवाई वाहतूक, नौकानयन, औषध निर्माण, टेलिकॉम, अवजड उदयोग, विद्युत, संरक्षण उत्पादने ईई सर्व उत्पादन, संशोधन क्षेत्रात सरकारी उद्योगांनी दैदिप्यमान प्रगती केली. स्वातंत्र्यानंतर देशाला औद्योगिक क्षेत्रात प्रगतीसाठी सार्वभौम व आत्मनिर्भर सार्वजनिक उद्योगांनी मागील सहा दशकात बनवले आहे. हे सरकारी क्षेत्र मोठे योगदान देत होते, त्यामुळे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू सार्वजनिक उद्योगांना देशाची मंदिरे असे म्हणाले होते. पण मोदी सरकार त्यांची विक्री करून देशाचे संपूर्ण नुकसान करत आहेत, अशी टीका ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनचे राष्ट्रीय सचिव कॉम्रेड सी.श्रीकुमार यांनी केले. (Public Enterprises are the Temples of the Nation – Comrade C. sreekumar)

खडकी येथे एम.टी.एस.एस.डी.वर्कर्स युनियनच्या (रणगाडा डेपो) कार्यालयात त्यांनी आज (दि.१८) माध्ययमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

Public Enterprises are the Temples

पुढे बोलताना ते म्हणाले, सार्वजनिक उद्योगासाहित संरक्षण उत्पादन क्षेत्रातील उद्योगात खाजगीकरण राबवण्याच्या मोदी सरकारच्या धोरणावर टीका करताना नफे कमवण्यासाठी कार्पोरेट उदयोगपतीना सरकार हवाई वाहतूक, विमानतळ, तेल, वीज कोळसा व इतर सर्व सरकारी उद्योग विकत आहे. 

कोरोना काळात खाजगी क्षेत्राने राष्ट्रीय जबाबदारी झटकली सरकारची रेल्वे, संरक्षण उद्योगातील कारखाने, सरकारी आरोग्य यंत्रणा देशभर महामारीच्या विरोधात काम करत होती. आज सरकारकडे स्वतःच्या मालकीची विमान कंपनी नाही. हळूहळू हे खाजगीकरण देशाची आत्मनिर्भर अर्थव्यवस्था नष्ट करणार आहेत, असेही सी श्रीकुमार म्हणाले.

यावेळी सलीम सय्यद, मोहन होल, विशाल डुंबरे, अमित गजमाल, सोन्याबापू घोगरे, दिनेश भिंताडे, दिलीप अंबवणे, हेमंत काकडे, अभिनंदन गायकवाड, सचिन कांबळे, राधा माच्रेकर, रमेश दीक्षित आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बँक नोट मुद्रणालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी!

बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत 499 पदांची भरती; ऑनलाईन करा अर्ज 

BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत भरती; ऑनलाईन करा अर्ज! 

ICAR : नागपूर येथे NBSSLUP अंतर्गत लिपिक, सहाय्यक पदांची भरती

धुळे येथे मनरेगा अंतर्गत 100 पदांची भरती; 8वी, 10वी उत्तीर्णांना संधी! 

कृषी सहसंचालक कोल्हापूर विभागात 250 रिक्त पदांची भरती 

NFSC : नागपूर येथे नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती 

ZP : पालघर जिल्हा परिषद अंतर्गत 991 पदांची भरती, ऑनलाईन करा अर्ज 

ZP : कोल्हापुर जिल्हा परिषद अंतर्गत 728 पदांची भरती; ऑनलाईन करा अर्ज !

Public Enterprises are the Temples
Public Enterprises are the Temples
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय