मुंबई : महाराष्ट्रात पूर्णपणे मंत्रीमंडळ स्थापन करा नंतरच निर्णय घ्या असा सुर विरोधी पक्षांमधून उमटत आहे. सध्या राज्य सरकार कडून घेतले जात असलेल्या निर्णयावर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. अशा शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विनंती केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, बार्बाडोस सारख्या देशात जिथे लोकसंख्या अवघी अडीच लाख आहे तिथे 27 मंत्री आहेत. पण महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी असूनही येथील मंत्रिमंडळात केवळ 2 जण आहेत. हे दोन्ही मंत्री राज्याशी संबंधित सर्व निर्णय घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा निर्णय येईपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी त्यांनी ट्विट करून केली आहे. या ट्वीट सोबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचा फोटोही शेअर केला आहे.
या अगोदर संजय राऊत यांनी ट्वीट केले होते कि, भारतीय राज्यघटनेच्या कलम 164 – 1A नुसार राज्याचे मंत्रीमंडळ किमान 12 मंत्र्यांचे असणे बंधनकारक आहे. त्यापेक्षा कमी संख्येचा मंत्रिमंडळाला घटनेची मान्यता नाही. गेले 2 आठवडे महाराष्ट्रात 2 मंत्र्यांचे मंत्रीमंडळ जे निर्णय घेतेय त्याला घटनात्मक वैधता नाही, असे म्हणत राज्यात हे काय सुरू आहे ? असा सवाल राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विचारला आहे.
हेही वाचा
ब्रेकिंग : शिंदे – फडणवीसांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादच्या नामांतरावर झाला ‘हा’ निर्णय
जुन्नर : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा – आमदार अतुल बेनके
पराभव समोर दिसत असल्यानेच राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या – किसान सभा
ST महामंडळात विविध रिक्त पदांसाठी भरती, आजच करा अर्ज
कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 134 पदांसाठी भरती, 10 वी / ITI / पदवीधरांसाठी संधी
MPSC मार्फत 800 जागांसाठी भरती, 24 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
पुणे महानगरपालिका अंतर्गत 113 रिक्त पदांसाठी भरती, 20 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख