Wednesday, May 1, 2024
Homeग्रामीणजुन्नर : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा – आमदार अतुल बेनके

जुन्नर : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा – आमदार अतुल बेनके

उंडेखडक, तळेरान येथील ठिकाणांचे जिओलॉजिकल सर्व्हेक्षण करा – आमदार अतुल बेनके

जुन्नर : गेल्या ८ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जुन्नर तालुक्यातील अनेक भागांत पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये विशेषतः भात पिके, भाजीपाला, टोमॅटो पिके सडल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सुचना आमदार अतूल बेनके यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत. तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे देखील या नुकसानी संदर्भात मदत मिळणेबाबत पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे.

आ. बेनके यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागासह तालुक्यात जोरदार अतिवृष्टी झाली आहे यामुळे भात पिकांसह इतर पिकांचे नुकसान, घरपड झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहेे.

त्याचप्रमाणे उंडेखडक (ता. जुन्नर) येथे अतिवृष्टीमुळे भुस्खलन झाले आहे यामुळे येथील नागरिक भयभीत झाले आहेत. उंडेखडक येथिल डोंगरावरील मातीचा काही भाग खचल्याने झाडे मातीखाली गाडली गेली आहे तर अतिवृष्टीमुळे तळेरान येथिल गोरगरीब आदिवासी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर भात शेती गाडली गेली आहे.

भविष्यात उंडेखडक व तळेरान येथिल नागरिक भयभीत होऊ नये व कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी उंडेखडक व तळेरान येथिल ठिकाणांचे तात्काळ जिओलॉजिकल सर्व्हेक्षण करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आदेश देण्याची मागणीही आ. बेनके यांनी केली आहे.

हेही वाचा :

जुन्नर : अतिवृष्टीमुळे शेती व पिकांचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्या – किसान सभेची मागणी

जुन्नर : संततधार पावसामुळे भात लावणी खोळंबली, अनेक गावातील बत्ती गुल

राज्यात पावसामुळे आतापर्यंत ९९ जणांचा बळी तर १८१ जनावरं दगावली

राज्यातील मुसळधार पावसाचा विद्यार्थ्यांच्या परिक्षेवरही परिणाम, ‘या’ परिक्षा ढकलल्या पुढे

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे येथे 58 रिक्त पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय